Name Change News : शेवटच्या दिवशी आक्षेप आणि समर्थनार्थ अर्जांचा पाऊस...

Marathwada : भाजप आणि शिंदेगट आज मात्र अर्ज दाखल करण्यासाठी स्वतंत्र गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
Name Change News
Name Change NewsSarkarnama

Chhatrapati SambahjiNagar : छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव असे नामांतर करण्याविषयी सूचना, आक्षेप, हरकती व सूचना दाखल करण्याचा सोमवार ( ता.२७) शेवटचा दिवस होता. गेल्या काही दिवसांपासून शहरात नामांतराच्या (Name Change) समर्थनात आणि विरोधात मोर्चे निघाले, साखळी उपोषण झाले. दरम्यान, नामांतराच्या विरोधात आक्षेप, हरकती, सूचना व समर्थनात अर्ज दाखल करण्याचे आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते.

Name Change News
Market Committee News : इच्छूकांचा उत्साह शिगेला; पहिल्या दिवशी २४९ जणांनी घेतले अर्ज..

विविध राजकीय पक्ष, संघटनांनी अर्ज भरून घेण्याची मोहिम शहरात राबवली होती. (Bjp) विरोधातील अर्ज दाखल केले जात होते, मात्र आज शेवटच्या दिवशी समर्थनात आणि विरोधातील अर्जांचा विभागीय आयुक्त कार्यालयात अक्षरशः पाऊस पडल्याचे चित्र पहायला मिळाले. (Aurangabad) सकल हिंदू एकत्रिकरण समिती, भाजप, मुस्लिम संघटना, एमआयएम या सगळ्यांनी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली.

त्यामुळे पोलिसांनी विभागीय आयुक्त कार्यालयात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला होता. भाजपने वाजत-गाजत समर्थनात अर्ज दाखल केले, तर सकल हिंदू एकत्रिकरण समितीने गाड्यांमध्ये अर्जांचे गठ्ठे आणून ते कार्यालयात जमा केले. त्यामुळे आज दिवसभर विभागीय आयुक्त कार्यालय गर्दीने गजबजलेले होते. विशेष म्हणजे नामांतराच्या समर्थनात एकत्र मोर्चात सहभागी झालेले भाजप आणि शिंदेगट आज मात्र अर्ज दाखल करण्यासाठी स्वतंत्र गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी स्वतः अर्जांचा गठ्ठा असलेले एक खोके डोक्यावरून गाडीत ठेवले आणि क्रांतीचौकातून टेम्पोला रवाना केले. भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळककर यांच्यास पदाधिकारी, नेते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थितीत होते. शिंदे गटाकडून जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी अर्जांचे गठ्ठे वेगवेगळ्या वाहनातून विभागीय आयुक्त कार्यालयात आणले होते.

छत्रपती संभाजीनगर व धाराशीव करण्याची अधिसूचना निघाल्यानंतर विभागीयस्तरावर २७ मार्चपर्यंत आक्षेप, हरकती आणि सूचना मागविल्या होत्या. रविवार ( ता. २६ ) पर्यंत ऑनलाईनसह आक्षेप दाखल करण्याचा आकडा १ लाख ५६ हजार २०३ वर पोहोचला होता. छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनात केवळ ११ हजार ८९० अर्ज तर धाराशिवच्या नामांतराविरोधात २८ हजार ५५५ आक्षेप दाखल झाले होते. त्यात सोमवारी शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजीनगराच्या समर्थनार्थ तब्बल चार लाख अर्ज दाखल झाल्याचा दावा केला जातोय.

Name Change News
Dharashiv Loksabha News : महाविकास आघाडीमुळे धाराशीवमध्ये ओमराजेंचे पारडे जड..

तर विरोधात तीन लाखांच्या वर आक्षेप दाखल झाल्याची चर्चा आहे. प्रशासनाकडून अर्ज दाखल करून घेण्यासाठी दोन ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती. छत्रपती संभाजीनगर नामांतराबाबत आक्षेप आवक-जावक विभागात स्विकारण्यात आले, तर समर्थनार्थ येणारे अर्ज हे आवक-जावक विभागाच्या उजव्या बाजुला असलेल्या शतकोटी वृक्ष लागवड कार्यालयात स्विकारण्यात आले. अर्ज दाखल करून घेण्यासाठी कर्मचारी संख्या वाढवण्यात आली होती.

अर्ज दाखल करून घेण्यासाठी प्रशासनाकडून ६० कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. सायंकाळी ६ वाजेपर्यंत आयुक्तालयाच्या परिसरात आक्षेप, हरकती, सूचना दाखल करण्यासाठी जेवढे नागरीक दाखल झाले होते, सहा वाजेनंतर केवळ त्यांचेच अर्ज दाखल करून घेण्यात आले. सकल हिंदू एकत्रीकरण समितीच्यावतीने छोट्या टेम्पोत भरून छत्रपती संभाजीनगराच्या समर्थनार्थ अर्ज आणले होते.

या टेम्पोत खोक्यांमध्ये तर काही अर्ज गठ्ठे बांधून आणले होते. भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी साखळी तयार करून टेम्पोतुन समर्थनाच्या अर्जांनी भरलेले खोके एकमेकांच्या मदतीने खाली उतरवले. रॅलीतील उघड्या जीपपुढे छत्रपती संभाजी महाराज यांचे छायाचित्र लावण्यात आले होते. यावेळी भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून `शिवा की जय बोलो, संभा की जय बोलो, सियावर रामचंद्र की जय ' च्या घोषणा देण्यात आल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com