विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्या; खैरेंनी घेतली उड्डयण मंत्र्यांची भेट

राज्य सरकारने याबाबत ५ मार्च २०२० रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत एकमताने निर्णय घेऊन मंजुरी दिली आहे. (Chandrakant Khaire)
Chnadrakant Khaire-Jotiraditya Shindiya
Chnadrakant Khaire-Jotiraditya ShindiyaSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्यातील तमाम जनतेच्या मागणीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने औरंगाबाद (Aurangabad) येथील चिकलठाणा विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज असे नामकरण करण्याचा निर्णय मंजूर केला आहे. (Shivsena) गेल्या अनेक वर्षांपासून या विमातळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव द्यावे, अशी मागणी शिवसेनेकडून केली जात आहे. (Chandrakant Khaire)

राज्य सरकारने या संदर्भातला ठराव मंजूर करून तो केंद्र सरकारकडे पाठवला आहे. याबाबत अधिकृत अधिसूचना काढण्याची विनंती शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली. नवी दिल्ली येथे केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पत्रासह खैरे यांनी त्यांना निवेदन दिले.

राज्याची पर्यटन व मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देण्यासाठी शिवसेनेने वारंवार पाठपुरावा केला होता. आता या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे नाव देण्यात यावे, अशी शिवप्रेमी जनतेची मागणी आहे. औरंगाबाद विमानतळाचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे करण्याचा ठराव महानगरपालिकेने २४ एप्रिल २००२ रोजी बहुमताने मंजुर केला होता.

राज्य सरकारने याबाबत ५ मार्च २०२० रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत एकमताने निर्णय घेऊन मंजुरी दिली आहे. ६ जानेवारी २०२१ रोजी केंद्रीय केंद्रीय नागरी उड्डयन मंत्र्यांकडे अधिसूचना काढण्यासाठी प्रस्ताव दिला. यावर सर्व बाबींचा सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी चंद्रकांत खैरे यांना दिले.

काही महिन्यांपुर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी आॅनलाईन सहभागी झालेल्या नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी महाराष्ट्र व छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या प्रती असलेले प्रेम, आदर व्यक्त केला होता. महाराष्ट्राशी आपले जवळचे नाते आहे, हे सांगायला देखील ते विसरले नाही.

Chnadrakant Khaire-Jotiraditya Shindiya
बदनापूर नगर पंचायतीत शतप्रतिशत सत्ता; नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष दोन्ही भाजपचेच

तेव्हा आता छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव औरंगाबाद विमानतळाला देण्याची मागणी मान्य करून ते या संदर्भातील अधिसूचना काढतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, चंद्रकांत खैरे हे नुकतेच आपला मणिपूर राज्याचा तीन दिवसांचा दौरा संपवून महाराष्ट्रात परतले. इंफाळ येथून दिल्लीत आल्यानंतर त्यांनी सिंधिया यांची भेट घेत पुन्हा एकदा त्यांना औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यासंदर्भातील प्रस्तावाची आठवण करून दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com