Nanded Loksabha Constituency : 'काही लोकांना लायकी नसताना पक्षानं मोठं केलं,पदं दिली'; चिखलीकरांचा रोख कोणाकडं?

Pratap Patil Chikhalikar News : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नांदेड लोकसभेची जागा महायुती शंभर टक्के जिंकणार, अशी खात्री चिखलीकर यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना होती.
Pratap Patil Chikhalikar
Pratap Patil Chikhalikar Sarkarnama

Nanded News : लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. पक्षात एक दोन अशी लोक आहेत, ज्यांना लायकी नसताना मोठी पदे मिळाली. पण लोकसभा निवडणुकीत त्यांनी विरोधात काम केले, मी त्यांना शेवटपर्यंत सोडणार नाही, असा दम माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी भरला.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhalikar) हे मतदारसंघात फिरून आढावा घेत आहे. साहजिकच यातून ते पराभवाची कारणे, पक्षविरोधी काम केलेल्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची माहिती जाणून घेत आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नांदेड लोकसभेची जागा महायुती शंभर टक्के जिंकणार, अशी खात्री चिखलीकर यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना होती.

अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी स्वतः प्रचारसभांमधून चिखलीकरांच्या विजयाची गॅरंटी दिली होती. मात्र प्रत्यक्ष निवडणूक निकाल हाती आला तेव्हा घडले वेगळेच. काँग्रेस महाविकास आघाडीचे वसंत चव्हाण यांनी प्रताप पाटील चिखलीकर यांचा 59 हजारांहून अधिक मतांच्या फरकाने पराभव केला.

या पराभवानंतर खरंतर भाजप आणि जिल्ह्यातील नेत्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज होती. पण चिखलीकरांकडून धमकी आणि सूडाची भाषा केली जात असल्याचे दिसून येत आहे. काही लोकांना पक्षात लायकी नसताना मोठ केलं, पदे दिली पण त्यांनीच विरोधात काम केल्याचा आरोप चिखलीकर यांनी एका कार्यक्रमात बोलताना केला. तसेच विरोधात काम करणाऱ्या एक-दोनजणांना मी शेवटपर्यंत मी सोडणार नाही, असा इशारा दिला.

Pratap Patil Chikhalikar
Ajit Pawar NCP: अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला डॅशिंग महिला पदाधिकारी करणार 'रामराम'

काही दिवसांपूर्वी भाजपच्या नेत्या माजी केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांता पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्याबाबतीत एक विधान केले होते. अशोक चव्हाण हे मोठे नेते आहेत, फक्त राज्यसभेची खासदारकी एवढीच त्यांची लायकी नाही. शिवाय नांदेडमध्ये भाजपाच्या पराभवाला त्यांना जबाबदार धरता येणार नाही, असे म्हणत पाटील यांनी अशोक चव्हाण यांची पाठराखण केली होती.

त्यानंतर माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पक्षात लायकी नसलेल्या एक-दोन लोकांना मोठं केलं, अशी टीका केली. आता त्यांचा इशारा नेमका कोणाकडे होता? याबद्दल जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. एकूण नांदेडमधील चिखलीकरांच्या पराभवानंतर भाजपमधील अंतर्गत कुरबुरी समोर येऊ लागल्या आहे.

अशोक चव्हाण यांनी नांदेडमधील पराभवाबद्दल अद्याप भाष्य केलेले नाही. त्यांचे मौन आणि चिखलीकरांची जाहीरपणे आपल्या पक्षातील नेत्यांवर अप्रत्यक्ष होणारे आरोप यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

Pratap Patil Chikhalikar
VIDEO - Ramtek Vidhan Sabha Election : रामटेक विधानसभेसासाठी ठाकरे गटाची महाविकास आघाडीत बंडखोरीचीही तयारी?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com