Nanded BJP News : देशात मोदींची लाट, नांदेडची जागा अशोक चव्हाणांना पराभूत करून जिंकणारच..

Marathwada Political News : कारखान्याच्या दीडशे कोटीच्या थकहमीसाठी अशोक चव्हाण यांनी भाजपच्या नेत्यांसमोर हात पसरले आहेत.
Nanded BJP Politics
Nanded BJP PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Nannded BJP News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार, असा दावा करत खळबळ उडवून देणाऱ्या भाजप खासदार प्रताप चिखलीकर यांनी आणखी एक दावा केला आहे. (BJP Politics News) आगामी लोकसभा निवडणुकीत नांदेड लोकसभेची जागा कुठल्याही परिस्थितीत भाजपच जिंकणार. अशोक चव्हाण यांचा लाखो मतांनी पराभव करणार असे म्हणत चिखलीकर यांनी त्यांना आव्हान दिले.

Nanded BJP Politics
Nanded BJP News : खासदार चिखलीकरांशी आणखी एका आमदाराने घेतला पंगा...

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चार दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्याचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी पुन्हा एकदा अशोक चव्हाण भाजपमध्ये येणार, असे विधान करत जुन्या चर्चेला हवा देण्याचे काम केले. बावनकुळे यांच्या विधानाचा संदर्भ देत खासदार चिखलीकर (MP Pratap Patil Chikhlikar) यांनीही अशोक चव्हाण (Ashok Chavan) भाजपमध्ये येणारच, तोट्यात असलेल्या भाऊराव सहकारी साखर कारखान्याच्या दीडशे कोटीच्या थकहमीसाठी अशोक चव्हाण यांनी भाजपच्या नेत्यांसमोर हात पसरले आहेत, असा आरोप करत चव्हाण यांचा भाजपमधील प्रवेश निश्चित असल्याचा दावा केला होता.

यावर नागपूर मध्ये अशोक चव्हाण यांनी `मी जिथे आहे तिथेच बरा` असे म्हणत खासदार चिखलीकर हे बेजाबाबदारपणे बोलत असल्याची टीका केली होती. यावरही आज चिखलीकर यांनी माध्यमांशी बोलताना अशोक चव्हाण यांनी राज्यात मुख्यमंत्री म्हणून काम केलेले आहे त्यामुळे त्यांनी जबाबदारीने बोलावे. चव्हाण (BJP) भाजपमध्ये येणार असे मी बोललो होतो, त्यावर आजही ठाम आहे. अशोक चव्हाण यांनीच आता या संदर्भातला खुलासा करावा.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

साखर कारखान्यासाठी दीडशे कोटीची थकहमी मिळावी म्हणून त्यांनी भाजपच्या नेत्यांसमोर हात पसरले होते की नाही? याचाही खुलासा करावा. कायम गुलाबात राहणाऱ्या चव्हाण यांना आता काटे टोचू लागले आहेत, त्यामुळे मला बेजबाबदार ठरवण्यापेक्षा त्यांनी स्वतः जबाबदारीने बोलावे, असा टोलाही चिखलीकर यांनी लगावला. नांदेड लोकसभेची जागा डेंजर झोन मध्ये असल्याच्या चर्चाही खोट्या आहेत.

भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हाती घेतलेले `मिशन 45` आम्ही पूर्ण करणारच. नांदेडची जागाही भाजपच जिंकणार, कारण देशात फक्त मोदी लाट आहे, असा दावाही चिखलीकर यांनी केला. राज्यातील महायुती सरकारने राज्यातील काही साखर कारखान्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी थकहमी देण्याचा निर्णय घेतला.

Nanded BJP Politics
Ashok Chavan News : `मी जिथे आहे, तिथेच बरा`.. भाजप प्रवेशाच्या चर्चेवर चव्हाण बोलले..

यात अशोक चव्हाण यांच्या भाऊराव सहकारी साखर कारखान्याचाही समावेश आहे. चव्हाण यांच्या कारखान्याला सरकारने दीडशे कोटींची थकहमी दिली आहे. या मदतीचा संबंध थेट चव्हाण यांच्या भाजप प्रवेशासाठी जोडला जात आहे. चिखलीकर यांनी याच थकहमीचा हवाला देत अशोक चव्हाण यांना खुलासा करण्याचे आव्हान दिले आहे. यावर आता अशोक चव्हाण काय उत्तर देतात? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Edited By : Jagdish Pansare

Nanded BJP Politics
BJP Politics : भाजपचे खासदार, इच्छुक, आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर; बावनकुळेंनी वाढवली धाकधूक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com