Marathwada News : या देशाला विकसित भारत करण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्प हाती घेतला आहे. गोरगरीबांच्या कल्याणाची गॅरंटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. ही मोदी गॅरंटीच देशाला विकासाच्या दिशेने नेणार आहे, असा विश्वास केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांनी व्यक्त केली. (Maharashtra BJP News) छत्रपती संभाजीनगर येथे `विकसित भारत संकल्प यात्रा` माध्यमातून यादव यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.
देशात यापुर्वी केंद्राच्या सगळ्या योजना या एका परिवाराच्या नावाने चालवल्या जात होत्या. पंतप्रधान मोदीजींनी (PM Modi) हा परिवारवाद नाहीसा करत गरीबांच्या कल्याणासाठी उज्वला, स्वनिधी योजना, आयुष्यमान भारत अशी कितीतरी योजना आणल्याचे सांगत काँग्रेसला टोला लगावला. (BJP) घेतलेल्या कर्जाची परतफेड करणाऱ्या प्रत्येक छोट्या विक्रेत्याच्या पाठीशी मोदीजी भक्कमपणे उभे राहिले, त्यांनी स्वतःच्या गॅरंटीवर कोणत्याही तारणाशिवाय कर्ज वाटप करणारी योजना दिल्याचे सांगितले.
ज्यांनी योजनांचा लाभ घेतला त्यांच्याशी आम्ही संवाद साधण्यासाठी आलो आहोत. तर ज्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळाला नाही, त्यांनीही नोंदणी करून लाभ घ्यावा, असे आवाहनही यादव यांनी यावेळी उपस्थितांना केले. (Marathwada) यादव आज दिवसभर छत्रपती संभाजीनगरातील विविध भागात फिरले. पंतप्रधान आवास योजना लाभार्थ्यांच्या घरी भेट देऊन त्यांच्याशीही चर्चा केली. सदरील योजनेच्या माध्यमातून अनेक गरजू नागरिकांना स्वतःचे घर बांधता आले. त्यांना हक्काचा निवारा तयार करता आला याचे अतिशय समाधान वाटते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
योजनांचा नागरिकांना लाभ होत आहे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांपर्यंत योजना संदर्भातील माहिती पोहोचविण्यात येत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. केंद्र सरकारच्या योजनांच्या माध्यमातून व्यवसायासाठी कर्ज प्राप्ती झालेल्या फेरीवाल्या लाभार्थ्यांशी यादव यांनी संवाद साधला. त्यांच्याकडून फळ खरेदी करत पैसे यूपीआयद्वारे डिजिटल पेमेंट माध्यमातून दिले.
कर्ज प्राप्तीमुळे लघु उद्योगासाठी हातभार लागला व मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची भावना फळ विक्रेत्यांनी यावेळी व्यक्त केल्या. 8 लक्ष रुपयांचा कर्ज पुरवठा होऊन आत्मनिर्भर झालेल्या तुळजाभवानी बचत गटातील लाभार्थी माता-भगिनींचीही भेट घेत यादव यांनी त्यांच्याशी संवाद साधला. सदरील बचत गट दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अंतर्गत स्थापन करण्यात आलेला आहे.
या योजनेअंतर्गत 10 हजार रुपयांचे खेळते भांडवलही देण्यात आले आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची माहिती घरोघरी जाऊन द्या, असे आवाहन केले. प्रत्येकांनी जर दहा घरात जरी या योजना आणि लाभार्थ्यांची माहिती दिली तर येणारी महापालिकी, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका जिंकणे अवघड नाही, असा विश्वास सावे यांनी व्यक्त केला.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.