Nanded BJP News : मुखेड बाजार समितीचे कारभारी ठरले..

Marathwada Politics : आघाडीच्या विजयी रथाचा वारु रोखण्यात राठोड यांना यश आल्याने भारतीय जनता पक्षाची बुज कशीबशी राखली गेली.
Nanded BJP News
Nanded BJP News Sarkarnama
Published on
Updated on

Market Committee News : मुखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठीची निवडणूक बुधवारी (ता १५) पार पडली. या बाजार समितीत भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता असुन सभापतीपदी बालाजी पाटील आंबुलेगेकर यांची तर उपसभापतीपदी व्यंकटराव पाटील तमशूट्टे यांची बिनविरोध निवड झाली आहे. (Nanded BJP News) नांदेड जिल्ह्यातील सात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पार पडल्या आहेत.

Nanded BJP News
Madhuri Dixit Nene : अभिनेत्री माधुरी दीक्षित राजकारणाच्या रिंगणात?

या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाने (BJP) सपाटून मार खाल्ला. पण याला अपवाद ठरली ती मुखेड कृषी उत्पन्न बाजार समिती. (Nanded) या निवडणूकीत आमदार डॉ तुषार राठोड यांनी माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या पॅनलला धुळ चारली व एकहाती विजय संपादन केला.

जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या विजयी रथाचा वारु रोखण्यात राठोड यांना यश आल्याने भारतीय जनता पक्षाची बुज कशीबशी राखली गेली. (Marathwada) तर माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या पदरात अपयश पडले. ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌गेल्या महिन्यात पार पडलेल्या उमरी, माहुर किनवट, कुंडलवाडी, बिलोली, लोहा या सहा बाजार समितीच्या सभापती व उपसभापतदाची निवडणूक पार पडली.

या सहा बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीदी महाविकास आघाडीच्या संचालकांची निवड झाली आहे. मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक स्थगित करण्यात आली होती. ही निवडणूक प्रक्रिया बुधवारी (ता १५) बाजार समितीच्या सभागृहात पार पडली.

सभापतीपदासाठी बालाजी पाटील व उपसभापतीपदासाठी व्यंकटराव पाटील यांचे एकमेव उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याने त्यांची या पदासाठी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली. निवडीची घोषणा होताच भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.या वेळी आमदार डॉ तुषार राठोड, माजी आमदार सुभाष साबणे, माजी सभापती बळवंतराव पाटील बेटमोगरेकर, गंगाधर राठोड,खुषालराव पाटील, आदी उपस्थित होते. ‌

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com