Nanded Loksabha: भाजपचं नांदेड पोटनिवडणुकीसाठी धक्कातंत्र, अशोक चव्हाणांच्या खास माणसालाच उतरवलं मैदानात; शेवटच्या दिवशी उमेदवारी

Nanded By Poll Election 2024 : भारतीय जनता पक्षाने राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी याद्या जाहीर केल्या. पण नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी घोषित करण्यासाठी शेवटचा एक दिवस शिल्लक असताना मुहुर्त मिळाला आहे.
Nanded By Poll Election .jpg
Nanded By Poll Election .jpgSarkarnama
Published on
Updated on

Nanded News: लोकसभेच्या नांदेड मतदारसंघातून पोटनिवडणुकीसाठी अपेक्षेप्रमाणे काँग्रेस महाविकास आघाडीने रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली. पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदरासंघातून काँग्रेस महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण हे 60 हजारांच्या मताधिक्याने विजय झाले होते.

परंतु 26 ऑगस्ट 2024 रोजी त्यांचे निधन झाले. त्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसोबतच नांदेड लोकसभा पोटनिवडणूक जाहीर झाली होती.

नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटचा एक दिवस शिल्लक असताना भारतीय जनता पक्षाने नांदेड दक्षिणचे आध्यक्ष डॉ संतुकराव हंबर्डे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

नांदेड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक काॅंग्रेसचे दिवंगत नेते वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे होत आहे. या जागेसाठी काॅंग्रेने प्रा रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्याविरूद्ध भाजपाचा उमेदवार कोण येतो याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

भारतीय जनता पक्षात नांदेडची पोटनिवडणूक लढविण्यासाठी माजी आमदार राम पाटील रातोळीकर, उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी, राजेश देशमुख कुंटरकर, यांच्यासह अनेक नांवाची चर्चा होती.उमेदवारीसाठी रस्सीखेच लागल्याने उमेदवारीचा सस्पेन्स वाढत गेला.

Nanded By Poll Election .jpg
Sameer Bhujbal Politics: समीर भुजबळ म्हणाले, "नांदगावचे प्रत्येक घर दहशतमुक्त करण्यासाठी माझी उमेदवारी"

भारतीय जनता पक्षाने (BJP) राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी याद्या जाहीर केल्या. पण नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी घोषित करण्यासाठी शेवटचा एक दिवस शिल्लक असताना मुहुर्त मिळाला आहे.

नांदेड लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या नांदेड दक्षिण, नांदेड उत्तर,भोकर, नायगाव, देगलूर, मुखेड या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो.या सहा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आले आहेत. या सर्व मतदारसंघात काँग्रेसने उमेदवार जाहीर केले आहेत.

Nanded By Poll Election .jpg
BJP Candidate List : भाजपची तिसरी यादी जाहीर! 25 उमेदवारांची घोषणा, माळशिरस, आष्टी, नागपूरमधील शिलेदार ठरले

नांदेड लोकसभा मतदारसंघांत येणाऱ्या सहा विधानसभा संघा पैकी चार जागा भाजपा, दोन जागा शिवसेना शिंदे गटाला जागा वाटपात आल्या आहेत . भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. संतुकराव हंबर्डे यांची ही पहिलीच निवडणूक आहे.

त्यांनी नांदेड शहरात सहयोग सेवा भावी संस्थांच्या माध्यमातून शैक्षणिक जाळे निर्माण केले आहे. गेल्या दहा वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे सक्रिय पदाधिकारी म्हणून काम केले असून या निमित्ताने निवडणुकीच्या रिंगणात प्रथमच उतरले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com