BJP Candidate List : भाजपची तिसरी यादी जाहीर! 25 उमेदवारांची घोषणा, माळशिरस, आष्टी, नागपूरमधील शिलेदार ठरले

Maharashtra Assembly Election BJP Candidate List : भाजपने तिसऱ्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तिसऱ्या यादीमध्ये 25 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
BJP Third Candidate List
BJP Third Candidate List sarkarnama
Published on
Updated on

BJP Candidate List: भाजपने तिसऱ्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तिसऱ्या यादीमध्ये 25 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून मुर्तिजापूरमधू हरिश पिंपळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर, कटोल मतदारसंघातून चरणसिंग बाबूलालजी ठाकूर यांना तर, माळशिरसमधून राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

मतदारसंघ उमेदवार

मुर्तिजापूर - हरिश पिंपळे

कारंजा - सई डहाके

तेओसा - राजेश वानखेडे

मोर्शी - उमेश यावलकर

आर्वी - सुमित वानखेडे

कटोल -चरणसिंग ठाकूर

सावनेर - आशिष देशमुख

नागपूर पश्चिम - सुधाकर कोहले

नागपूर उत्तर - मिलिंद माने

साकोली - अविनाश ब्राह्मणकर

चंद्रपूर - किशोर जोरगेवार

आर्णी - राजू तोडसाम

उमरखेड - किशन वानखेडे

देगलूर -जितेश अंतापूरकर

डहाणू - विनोद मेढा

वसई - स्नेहा दुबे

बोरवली - संजय उपाध्याय

वर्सोवा - भारती लव्हेकर

घाटकोपर पूर्व- पराग शहा

आष्टी - सुरेश धस

लातूर शहर - अर्चना चाकूरकर

माळशिरस - राम सातपुते

कराड उत्तर - मनोज घोरपडे

पलूस कडेगाव - संग्राम देशमुख

माळशिरसमधून सातपुते

माळशिरस मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उत्तम जानकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे विद्यमान आमदार राम सातपुते यांना भाजप पुन्हा संधी देणार की नाही याची चर्चा होती. पहिल्या दोन यादीमध्ये सातपुते यांचे नाव नसल्याने उलटसुलट चर्चा सुरू होत्या. मात्र, आज जाहीर झालेल्या भाजपच्या तिसऱ्या यादीमध्ये माळशिरसमधून पुन्हा राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

BJP Third Candidate List
Kolhapur North Constituency: महाडिकांच्या डावात पाहुणा 'नाना' बाद, सत्यजित कदमांच्या मेहनतीवर पाणी

आष्टीत सुरेश धस

आष्टीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे आहेत. ते अजित पवारांच्या सोबत आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. मात्र, भाजपने या जागी आपला उमेदवार घोषित करत सुरेश धस यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

BJP Third Candidate List
Kannad Assembly Constituency: कन्नडमध्ये शिवसेनेचा `धनुष्यबाण` संजना जाधव यांच्या हाती, निशाणा `दानवे` साधणार!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com