MLA Rajesh Pawar News : सत्ता भाजपची, पण नांदेड महापालिका आमदाराच्या पत्राची दखलच घेईना; राजेश पवार करणार प्रशासनाचा हिशोब चुकता!

Political News : चार महिने उलटून गेले तरी शहरातील चित्र काही बदलले नाही. मोकाट कुत्रे, रस्त्यांवरील खड्डे, वाहतूक कोंडी, अतिक्रमण अशा मुलभूत प्रश्नावर काहीच काम होताना दिसत नाही.
BJP MLA Rajesh Pawar
BJP MLA Rajesh Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Nanded Municipal Corporation : नव्याचे नऊ दिवस म्हटल्या प्रमाणे नांदेड महापालिकेतील कारभारावर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ते ही बहुमतासह सत्ता असलेल्या भाजपच्याच आमदाराकडून. नांदेड-वाघाळा महापालिकेत खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा कमळ फुलले. चव्हाण यांच्या मर्जीनेच महापौर, उपमहापौर, सभापती व इतर पदांवर नगरसेवकांची वर्णी लावली गेली. चार महिने उलटून गेले तरी शहरातील चित्र काही बदलले नाही. मोकाट कुत्रे, रस्त्यांवरील खड्डे, वाहतूक कोंडी, अतिक्रमण अशा मुलभूत प्रश्नावर काहीच काम होताना दिसत नाही.

भाजपचे नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार हे प्रतिनिधित्व ग्रामीण भागाचे करत असले तरी वास्तव्य त्यांचे नांदेड शहरातच आहे. त्यामुळे या विषयावर त्यांनी महापालिका प्रशासनाला जाब विचारत एक-दोन नव्हे तर डझनभर पत्र पाठवली आहेत. परंतु महापालिकेने अद्याप त्यांना उत्तर दिलेले नाही, काही विषयावर थातुरमातूर उत्तर देऊन वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले आहे.

सत्ताधारी आमदारालाच महापालिकेतील अधिकारी जुमानत नसतील तर तिथे सर्वसामान्यांचे काय? असा प्रश्न या निमित्ताने केला जात आहे. प्रशासनाने मात्र आमदार राजेश पवार यांनी उपस्थित केलेले मुद्दे हे नांदेड नगरपालिका काळापासूनचे आहेत, महापालिकेची स्थापना झाली तेव्हाही हे प्रश्न होते. परंतु आमदारांचा अनादर करण्याचा आमचा कोणताही हेतू नाही, त्यांच्या पत्राला उत्तर आणि माहिती देण्यासाठी उपायुक्त यांना लक्ष घालण्यास सांगितले असल्याचे आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांनी स्पष्ट केले.

BJP MLA Rajesh Pawar
Satara Politic's : 'पवारांची राष्ट्रवादी शिंदेसेनेच्या नगराध्यक्षांच्या खांद्यावर बंदूक ठेवून महायुतीचाच गेम करतेय'

काय आहे समस्या? आमदार राजेश पवार यांनी महापालिका प्रशासनाला पाठवलेल्या डझनभर पत्रातून शहरातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव, मोकाट जनावरे, शहरातील उघडी ड्रेनेज, खराब रस्ते, रस्त्यावरील खड्डे, अतिक्रमण आणि त्याचा होणारा अडथळा, अपघात यावर काय उपाय योजना करण्यात आल्या आहेत? याबाबत माहिती मागितली आहे.

BJP MLA Rajesh Pawar
Satara Politic's : 'पवारांची राष्ट्रवादी शिंदेसेनेच्या नगराध्यक्षांच्या खांद्यावर बंदूक ठेवून महायुतीचाच गेम करतेय'

याशिवाय महापालिका शाळांची तपासणी, मुल्यमापन, आरोग्य केंद्र, अग्निशामक दल, शहरात लागलेले अवैध, धोकादायक होर्डिंग, बीओटी तत्त्वावर दिलेल्या व्यापारी संकुलांच्या छतावर अनधिकृतपणे उभारण्यात आलेले जीम, स्वीमिंग पूल आदींची चौकशी करण्याची मागणीही राजेश पवार यांनी आपल्या पत्रांमधून केली आहे.

BJP MLA Rajesh Pawar
MLA Hemant Patil : "महाराष्ट्राच्या राजकारणाचा चुथडा झालाय... या सगळ्याचा उबग आलाय" : एकनाथ शिंदेंच्या आमदाराची उद्विग्नता; महायुतीला घरचा आहेर

शिवसेना आमदारांवर कुरघोडी!

नांदेड महापालिका शहरी भागात शिवसेनेचे दोन आमदार आहेत. नांदेड दक्षिणचे आनंद बोंढारकर तर उत्तरचे बालाजी कल्याणकर. पण या दोन्ही आमदारांनी नागरी समस्यांवर मौन बाळगले असल्याचे चित्र आहे. या दोघांवर कुरघोडी करत नायगावचे आमदार राजेश पवार यांनी थेट शहरातील नागरी प्रश्नांना हात घालत महापालिका प्रशासनाला धारेवर धरण्याची तयारी सुरू केली आहे. आधीच जिल्ह्याच्या राजकारणात बॅकफूटवर गेलेल्या शिवसेनेच्या हातून जनतेच्या हिताच्या प्रश्नांचा मुद्दाही मित्र पक्षाच्या आमदाराकडून हिसकावण्यात आल्याची चर्चा यानिमित्ताने होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com