Nanded DCC Bank: सगळे विरोधक एकत्र आले... तरीही नांदेडमध्ये अशोक चव्हाणच किंग : नांदेड जिल्हा बँकेवर एकहाती सत्ता

Nanded DCC Bank, Ashok Chavan, Shetkari Vikas Panel: नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्या शेतकरी विकास पॅनलने २३ पैकी २१ जागा जिंकत बँकेवर निर्विवाद वर्चस्व मिळवले. पाच महिला प्रथमच संचालक मंडळात दाखल झाल्या.
Nanded District Grampanchayat Election News
Nanded District Grampanchayat Election NewsSarkarnama
Published on
Updated on

Nanded DCC Bank: शेतकर्‍यांचे हित साधायचे आहे म्हणत नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर अखेर अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलने वर्चस्व मिळवले. २३ पैकी २१ जागा निवडून आणत या पॅनलने एकहाती सत्ता मिळवली. तर दोन उमेदवार हे स्वतंत्रपणे निवडून आले आहेत. अकरा संचालक बिनविरोध निवडून आणल्यानंतर १२ संचालकांसाठी प्रत्यक्षात मतदान झाले. यापैकी १० जागा शेतकरी विकास पॅनलने जिंकल्या.

संपूर्ण संचालक मंडळ बिनविरोध निवडून आणण्यासाठी खासदार अशोक चव्हाण यांनी प्रयत्न केले होते. यात त्यांना पन्नास टक्के यश मिळाले. अकरा संचालक बिनविरोध निवडून आणल्यानंतर उर्वरित बारा जागांसाठी तडजोडीचे प्रयत्न फसले. मात्र मतदारांना आवाहन करत अशोक चव्हाण व त्यांच्या सहकार्यांनी १० संचालक निवडून आणत जिल्हा बँकेची सूत्र आपल्याकडे राखली.

Nanded District Grampanchayat Election News
Ashok Chavan : नांदेड जिल्हा बँकेत अशोक चव्हाण यांचा 'सबका साथ'फॉर्म्युला! सर्व संचालक बिनविरोध?

तीन आमदार आणि काही माजी संचालकांना बिनविरोध निवडून आणत अशोक चव्हाण यांनी अर्धी लढाई आधीच जिंकली होती. इतर वेळी अशोक चव्हाण यांना विरोध करणारे जिल्ह्यातील सर्वच पक्षाचे नेते जिल्हा बँकेसाठी मात्र एकत्र आल्याचे चित्र या निवडणुकीत दिसून आले. अर्थात त्यासाठी स्वत: किंवा आपल्या नातेवाईकांची संचालक मंडळात त्यांनी वर्णी लावून घेतली होती.

यावेळचे वैशिष्ट म्हणजे बँकेच्या इतिहासात संचालक मंडळामध्ये प्रथमच पाच महिलांना संधी मिळाली आहे. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या प्रतिनिधीसाठी असलेल्या मतदारसंघातील 16 जागांपैकी नऊ जागांवर झालेल्या प्रत्यक्ष निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचे सात उमेदवार विजयी झाले तर उर्वरित दोन जागांवर कृष्णा नागेश पाटील आष्टीकर, संगीता पाटील नांदेड या दोन स्वतंत्र उमेदवारांचा विजय झाला आहे.

Nanded District Grampanchayat Election News
Nanded Election: नांदेड जिल्हा बँक बिनविरोध करण्याच्या अशोक चव्हाणांच्या प्रयत्नांना सुरूंग; 12 संचालकांसाठी होणार निवडणूक

बारा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सर्वात चुरसीची निवडणूक हिमायत नगर, देगलूर व माहुर तालुक्यात झाली. या तीनही जागांवर शेतकरी विकास पॅनलचे माधवराव जवळगावकर, विजयसिंह देशमुख, राजेंद्र केशवे ही विजयी झाले आहेत. गेल्या संचालक मंडळातील सहा माजी संचालकांची बँकेत पुन्हा वर्णी लागली आहे. तर सतरा नवे चेहरे यंदाच्या संचालक मंडळात दिसणार आहे.

हे आहेत नवनिर्वाचित संचालक

बी.आर कदम, मारोतराव कवळे, प्रताप पाटील चिखलीकर, प्रणिता देवरे- चिखलीकर, भीमराव केराम, विजयसिंह देशमुख, दत्तात्रय रेड्डी, संगीता विठ्ठल पाटील, श्रीनिवास चव्हाण, मीनल निरंजन पाटील, राजीव गंगाधर जाधव, राजेंद्र केशवे, डॉ. तुषार राठोड, मारुती जाधव, कृष्णा पाटील आष्टीकर, माधवराव पवार जवळगावकर, शिवराम लुटे, कैलास देशमुख गोरठेकर, ज्ञानेश्वर दहिफळे, पूनम पवार, सुशिलाबाई पाटील बेटमोगरेकर, अनिल पाटील बाभळीकर व रामचंद्र मुसळे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com