Nanded DCC Bank: नांदेड जिल्हा बँकेच्या नोकरभरतीवरील स्थगिती उठणार का? नवे अध्यक्ष तुषार राठोड यांच्यासमोरील मोठे आव्हान

Nanded Politics: महायुती प्रणित शेतकरी विकास पॅनेल नांदेड जिल्हा बँकेच्या निवडणूकीत 23 पैकी 22 जागा जिंकत सत्ता मिळवली. मुखेडचे भाजपा आमदार डाॅ. तुषार राठोड यांची अध्यक्षपदी तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मीनल पाटील खतगावकर यांची उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली.
Nanded DCC Bank Tushar Rathod
Nanded DCC Bank BJP MLA Tushar Rathodsarkarnama
Published on
Updated on

BJP News : नांदेड जिल्हा बँकेची सत्ता आणि अध्यक्ष पद भाजपाने राखल्यानंतर पुन्हा एकदा नोकरभरतीचा विषय पुढे येऊ लागला आहे. गेल्या वर्षी सहकार विभागाच्या आदेशाने नांदेड जिल्हा बँकेच्या नोकरभरतीला स्थगिती देण्यात आली होती. तत्त्कालीन संचालक मंडळाने नोकरभरतीत आपापला कोटा ठरवून वशिलेबाजी सुरू केल्यामुळे ही भरतीच स्थगित करण्यात आली होती.

महायुती प्रणित शेतकरी विकास पॅनेल नांदेड जिल्हा बँकेच्या निवडणूकीत 23 पैकी 22 जागा जिंकत सत्ता मिळवली. मुखेडचे भाजपा आमदार डाॅ. तुषार राठोड यांची अध्यक्ष पदी तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मीनल पाटील खतगावकर यांची उपाध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली.

नव्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाची पहिली सभा पुढील आठवड्यात होणार आहे. या पार्श्वभूमीवर नोकरभरतीवरील स्थगिती उठवण्यावर बैठकीत चर्चा होणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. परभणी, लातूर जिल्हा बँकेने आपापल्या नोकरभरती प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. आता नांदेड जिल्हा बँकेची रखडलेली नोकरभरती कधी होणार? याची चर्चा सुरू आहे.

नांदेड जिल्हा बँकेतील प्रस्तावित नोकरभरतीचा विषय गेल्या वर्षी चांगलाच गाजला होता नोकरभरती करण्यापूर्वी बिंदू नामावलीस शासनाची मान्यता न घेताच बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाने त्रयस्थ संस्थेमार्फत भरती प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न केला होता. यात प्रत्येक संचालकाचा कोटा निश्चित करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले होते.

Nanded DCC Bank Tushar Rathod
APMC Land Controversy: भाजपमधून शिवसेनेत प्रवेश करताच पठाडेंनी वादग्रस्त निर्णय फिरवला, कोट्यवधींची जमीन बिल्डरला देण्याचा प्रस्ताव गुंडाळला

त्यानंतर सहकार खात्याने या बँकेतील नोकरभरती प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. सहकार आयुक्तांच्या आदेशानुसार विभागीय सहनिबंधकांनी बँकेतील नोकरभरतीला गेल्या ऑक्टोबर महिन्यात स्थगिती दिली होती. तेव्हा तत्कालीन संचालक मंडळा विरुद्ध भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारही केली होती.

आता बँकेवर भाजपची सत्ता असून भाजपचे आमदार तुषार राठोड हे अध्यक्ष आहेत. नोकर भरतीच्या विषयात मागील मंडळातील ज्या संचालकांच्या भूमिकेविषयी शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. ते संचालक किंवा त्यांचे नातेवाईक हे नव्या संचालक मंडळातही निवडून आले आहेत. त्यामुळे स्थगिती उठवल्यानंतर होणारी नोकरभरती पारदर्शक पद्धतीने होईल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Nanded DCC Bank Tushar Rathod
Congress News: पुण्यात महाविकास आघाडीला तडा; शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर काँग्रेसचे खळबळजनक आरोप: प्रदेशाध्यक्षांसमोरच स्वबळाचा नारा

नोकर भरती प्रक्रियेतील उमेदवारांची लेखी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यासाठी तीन नामांकित संस्था निश्चित करण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. त्यानूसार आयबीपीएस, टीसीएस किंवा एमकेसीएल या संस्थांकडूनच भरती प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. नांदेड बँकेचे अध्यक्ष आमदार तुषार राठोड मुख्यमंत्र्यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात.

येत्या आठवड्यात त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळातील पहिली संचालक मंडळाची बैठक होणार आहे. बँकेतील नोकर भरती प्रक्रिया सुरू करण्यास पूर्वी सहकार मंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे जाऊन या प्रक्रियेवरील स्थगिती उठवण्या संबंधीचे आदेश ते मिळवतात का? यावर नोकरभरतीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com