Congress News: पुण्यात महाविकास आघाडीला तडा; शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर काँग्रेसचे खळबळजनक आरोप: प्रदेशाध्यक्षांसमोरच स्वबळाचा नारा

NCP Vs Congress: पुणे महापालिका निवडणुकीत शरद पवार गटासोबत आघाडी करणे ही चूक ठरली, अशी स्पष्ट भूमिका खडकवासला विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतली आहे.
Harshwardhan Sapkal Sharad Pawar.jpg
Harshwardhan Sapkal Sharad Pawar.jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे महापालिका निवडणुकीत शरद पवार गटासोबत आघाडी करणे ही चूक ठरली, अशी स्पष्ट भूमिका खडकवासला विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतली आहे. यापुढे शरद पवार गटासोबत कोणत्याही प्रकारची आघाडी नको, काँग्रेसने स्वबळावर लढावे, अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे केली.

राहुल गांधी यांच्या संकल्पनेतील ‘छात्रों की गूंज’ विद्यार्थी संवाद व जनजागृती कार्यक्रमाच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सपकाळ खडकवासला मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी खडकवासला विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचे अध्यक्ष उमेश भीमराव कोकरे यांनी स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना सपकाळ यांच्यासमोर मांडत निवेदन दिले.

पुणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटासोबत केलेल्या आघाडीचा काँग्रेसला स्थानिक पातळीवर फटका बसल्याचा दावा कोकरे यांनी केला. शरद पवार गटाच्या सतत बदलणाऱ्या राजकीय भूमिकांमुळे काँग्रेसचे नुकसान होत असल्याचे सांगत त्यांनी यापुढे अशी राजकीय आघाडी टाळण्याची मागणी केली.

‘काँग्रेसने स्वबळावर लढावे’

शरद पवार गटाच्या धरसोड भूमिकांचा फायदा भाजप आणि महायुतीतील घटक पक्षांना होत असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसने स्वबळावर अधिक ठामपणे जनतेसमोर जावे, अशी भूमिका मांडण्यात आली.

Harshwardhan Sapkal Sharad Pawar.jpg
Kolhapur Politics: मंडलिक अन् महाडिकांवर मुश्रीफांनी टाकली 'गुगली'; अडीच वर्षे आधीच लोकसभेची दावेदारी, पण कुठला झेंडा घेणार हाती?

काँग्रेस नेते कोकरे यांनी केलेल्या या मागणीला उपस्थित कार्यकर्त्यांनीही जोरदार पाठिंबा दिला. यानंतर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घेत या मागणीची वरिष्ठ पातळीवर दखल घेतली जाईल, अशी ग्वाहीही यावेळी त्यांनी दिली.

दरम्यान, खडकवासला मतदारसंघात काँग्रेसने २०२९च्या विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच पक्षबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे पुणे महापालिका निवडणुकीतील युतीचा अनुभव पुढे ठेवत काँग्रेस स्वबळाची भूमिका घेणार का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Harshwardhan Sapkal Sharad Pawar.jpg
BJP News : सलग पराभवानंतर माजी काँग्रेस आमदाराची भाजपमध्ये जाण्यासाठी धडपड; CM फडणवीसांच्या खासगी सचिवांमुळे ‘एन्ट्री’ला ब्रेक?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com