Devendra Godbole
Devendra GodboleSarkarnama

VIDEO - Ramtek Vidhan Sabha Election : रामटेक विधानसभेसासाठी ठाकरे गटाची महाविकास आघाडीत बंडखोरीचीही तयारी?

Devendra Godbole Thackeray group : जिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोलेंनी पदाधिकाऱ्यांना संघर्षासाठी तयार राहण्याची केली सूचना .

Devendra Godbole on Ramtek Vidhan Sabha Election : लोकसभा निवडणुकीनंतर आता राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्या दृष्टीने प्रत्येक पक्ष तयारी करत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षातच मतदारसंघांवरून चांगलीच खेचाखेच होणार असल्याचे दिसत आहे.

त्या पार्श्वभूमीवर पक्ष काय निर्णय घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. रामटेक मतदारसंघावरून महाविकास आघातील ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात असा वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत.

'रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराच्या विजयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सिहांचा वाटा आहे. पक्ष आणि पक्षचिन्ह हिरावून घेतल्याचा बदला शिवसैनिकांनी शिंदेसेनेचा पराभव करून घेतला. आपला परंपरागत मतदारसंघ काँग्रेसला देऊन शिवसैनिकांना मोठा त्याग केला आहे.'

तसेच 'आता रामटेक विधानसभा आपल्या हातून जाणार नाही याची खबरदारी घ्या. संघर्षाची तयारी ठेवा. घरी बसून राहिल्यास हा मतदारसंघ हातचा गेला समजा.' असा इशारा ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोले यांनी दिला. हे सांगताना त्यांनी काँग्रेसपासून सावध राहण्याचाही सल्ला दिल्याचे समोर आले आहे.

Devendra Godbole
Sunil Kedar Vs Sameer Meghe : रामटेक जिंकलं अन् केदारांचा कॉन्फिडन्स 10 पटीनं वाढला; हिंगण्यातून थेट मेघेंनाच चॅलेंज

जिल्हाप्रमुख गोडबोले म्हणाले, 'रामटेक लोकसभा मतदारसंघ चार वेळा शिवसेनेने जिंकला आहे. असे असताना महाविकास आघाडी असल्याने काँग्रेससाठी ही जागा सोडण्यात आली. पक्ष आणि चिन्ह हिरावून घेतल्याने आपणही माघार घेतली.

शिंदे सेनेचे बदला घेण्यासाठी शिवसैनिकांनी येथे झोकून दिले होते. काँग्रेसचे पाच पैसे घेतले नाही. त्यांच्या चहासुद्धा शिवसैनिक दबेल नाही. धनुष्यबाण रामाचा, नाही कोणा गद्दाराचा हा राग मनात ठेवून शिंदेसेनेचे राजू पारवे यांना पराभूत केले.'

Devendra Godbole
Ramtek's Defeat Effect : रामटेकचा पराभव भाजपच्या जिव्हारी; एका आमदाराचे तिकिट कापणार, दुसऱ्याची मंत्रिपदाची संधी हुकणार!

तसेच 'विधानसभेच्या निवडणुकीत रामटेक विधानसभेवरही काँग्रेस दावा करू शकते, हे लक्षात ठेवा. तो जाणार नाही यासाठी संघर्षाची तयारी ठेवा. वेळ पडल्यास मातोश्रीवर जाऊ, शिवसेना भवनावर धडक देऊ.

सांगलीमध्ये उबाठाचा उमेदवार असताना काँग्रेसने बंडखोरी केली होती. ते जिंकूनसुद्धा आले. एवढी ताकद आपल्याला रामटेकमध्ये निर्माण करावी लागले असे सांगून गोडबोले यांनी प्रसंगी बंडखोरीची तयारी ठेवा असेही सूचित केले.

रामटेकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे आशिष जयस्वाल आमदार आहेत. या मतदारसंघात काँग्रेसही सातत्याने लढत आहे. महायुतीमध्ये काँग्रेसही या मतदारसंघावर दावा करणार आहे हे निश्चित आहे. माजी मंत्री आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक हेसुद्धा तयारी करती आहे. त्यांच्या नावाला ठाकरे गटाने आपली दावेदारी रेटून विरोध करणे सुरू केले आहे. मंथन बैठका घेऊन ठाकरे गटाच्यावतीने वातावरण तापविले जात आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com