Nanded Lok Sabha Election News : नांदेड लोकसभेसाठी चौघात रस्सीखेच; भाजप उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार...

Political News : लवकरच लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते हे गृहीत धरून सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे.
Meenal Patil, pratap patil, santuk hambrde, ram patil
Meenal Patil, pratap patil, santuk hambrde, ram patil Sarkarnama
Published on
Updated on

Nanded News : लोकसभा निवडणूक तोंडावर आली असल्याने सर्वांनीच जोरदार तयारी सुरू केली आहे. येत्या काळात लवकरच लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते हे गृहीत धरून सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. महायुतीच्या जागावाटपात नांदेड लोकसभेची जागा भाजपला सुटणार असल्याने पक्ष निरीक्षकांनी नांदेडला येऊन उत्सुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत.

भाजपचे विद्यमान खासदार प्रतापराव पाटील-चिखलीकर, आमदार राम पाटील-रातोळीकर, नांदेड दक्षिणचे अध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे इच्छुक आहेत, तर काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या डॉ. मीनल पाटील खतगावकर यांनीदेखील उमेदवारी मागितली आहे. या जागेसाठी चार उमेदवार उत्सुक असल्याने पक्ष कोणाला उमेदवारी देतो, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. (Nanded Lok Sabha Election News)

Meenal Patil, pratap patil, santuk hambrde, ram patil
Vinod Patil : विनोद पाटलांची मोठी घोषणा; छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा लढवणार

भाजपने मिशन 45 यशस्वी करण्यासाठी जोरदार तयारी केली जात आहे. नांदेडची जागा डेंजर झोनमध्ये असल्याचे लक्षात आल्यावर पक्षाने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासारख्या तगड्या नेत्याला गळाला लावत प्रवेश दिला.

गेल्या निवडणुकीत भाजपने ही जागा काँग्रेसकडून खेचून आणली होती. या विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी भाजपने गेल्या सहा महिन्यांपासून तयारी सुरू केली आहे.

नांदेडचा उमेदवार कोण असावा, यासाठी पक्षाने माजी मंत्री सुभाष देशमुख, आमदार जयकुमार रावल यांना निरीक्षक म्हणून पाठविले होते. या निरीक्षकांनी नांदेड शहरातील एका हाॅटेलमध्ये उत्सुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यासोबतच पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या मुलाखतीतून चार नावे पुढे आली आहेत.

नांदेडच्या जागेसाठी प्रताप चिखलीकर उत्सुक आहेत. त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे तसेच उमेदवारी मलाच मिळणार व जिंकून येणार, असा दावा काही महिन्यांपूर्वी केला होता. या जागेसाठी रातोळीकर, हंबर्डे हेसुद्धा उत्सुक आहेत. यांनी उमेदवारी मिळण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपमध्ये अशोक चव्हाण यांनी प्रवेश केल्यानंतर माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, त्यांच्या सुनबाई डॉ. मिनल पाटील खतगावकर यांनी भाजपमध्ये (Bjp) प्रवेश केला आहे. काॅंग्रेसमध्ये असताना डॉ. मीनल खतगावकर यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली होती. आता भाजपमध्ये आल्यानंतर त्यांनी उमेदवारी मागितली आहे.

भाजपमध्ये अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी प्रवेश केल्यानंतर पक्षातील वातावरण बदलून गेले आहे. पक्षाने चव्हाणांना राज्यसभेत पाठविले आहे, तर त्यांच्या सोबत आलेल्या माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर (Bhaskar Khatgavkar) यांचे पुनर्वसन करण्याचा शब्द दिला असेल, तर डॉ. मीनल खतगावकर यांना उमेदवारी दिली जाऊ शकते असे बोलले जात आहे. दुसरीकडे विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारणे पक्षाला जड जाणार आहे. या परिस्थितीतून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना मार्ग काढावा लागणार आहे.

(Edited By : Sachin Waghmare)

R

Meenal Patil, pratap patil, santuk hambrde, ram patil
Pratap Chikhlikar : खासदार चिखलीकर दोन पावलं मागे; पक्षांतर्गत विरोधकांना शांत करण्यात यशस्वी...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com