Lok Sabha Election 2024 : नांदेडमध्ये महायुती-'मविआ' दोघेही बाहुबली, 'वंचित' किंगमेकरच्या भूमिकेत

Nanded Loksabha Constituency Politics : महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश झाल्याने राजकीय समीकरण बदलले...
Ashok Chavan, Prakash Ambedkar
Ashok Chavan, Prakash AmbedkarSarkarnama

Lok Sabha Election Nanded Politics :

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा समावेश करण्यात आल्याचे पत्र तीनही पक्षांच्या संमतीने काढण्यात आले. प्रकाश आंबेडकर यांनीही त्याला दुजोरा दिला असला तरी जागावाटप अद्याप ठरलेले नाही, असे म्हणत संभ्रम निर्माण केला. दुसरीकडे वंचित सोबत आल्यामुळे राज्यात महाविकास आघाडीची ताकद वाढणार आणि त्यांचे खासदार सर्वाधिक निवडून येणार, असे दावे केले जात आहेत.

Nanded Loksabha Constituency चा विचार केला तर जिल्ह्यात महाविकास आघाडी आणि महायुती हे दोघेही भक्कम आहेत. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेत चुरशीच्या लढती पहायला मिळणार आहेत. आता यात नेमकं बाजी कोण मारणार? याच्या चर्चा रंगल्या आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघात नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, भोकर, मुखेड, देगलूर, नायगाव या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. यातील तीन मतदारसंघ काँग्रेसकडे तर दोन भाजप व एक शिवसेना शिंदे गटाकडे आहे.

Ashok Chavan, Prakash Ambedkar
Latur BJP News: 'मी खूप विकासकामे केली; उमेदवारी मलाच मिळणार!'; भाजपच्या नेत्याचा दावा

गेल्या निवडणुकीत तिरंगी लढतीत भाजपचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर हे विजयी झाले होते. त्यांनी काँग्रेच्या अशोक चव्हाण यांचा पराभव केला होता. भोकर, नांदेड दक्षिण, देगलूर या तीन मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत. भोकर विधानसभा मतदारसंघात गेल्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाणांना पाच हजारांचे मताधिक्य मिळाले होते. पण लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण 98 हजारांच्या माताधिक्याने निवडून आले होते.

काँग्रेसला हे मताधिक्य टिकवावे लागणार आहे. नांदेड उत्तर मध्ये 30 हजारांचे तर दक्षिण मतदारसंघात पाच हजारांचे मताधिक्य काँग्रेसला मिळाले होते. भाजपकडे नायगाव व मुखेड हे दोन मतदारसंघ तर नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडे आहे. गेल्या निवडणुकीत मुखेडमध्ये 36 हजार, नायगाव 20 हजार तर देगलूरमधून 15 हजारांचे मताधिक्य मिळाल्याने चिखलीकरांचा विजय झाला होता. तिन्ही मतदारसंघात विद्यमान आमदरांनी विकासकामांना गती दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)  

तसेच त्यांची मतदारसंघावर चांगली पकड आहे. देगलूर बिलोली या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे जितेश आ़तपूरकर हे 40 हजारांच्या मताधिक्याने निवडून आले आहेत. या विजयात माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचा खूप मोठा वाटा आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुतीचे पेपरवर बळ समान आहे. गेल्या वेळी भाजप-सेना युती होती तर राष्ट्रवादी व काँग्रेसची आघाडी.

जिल्ह्यातील राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. शिवसेना व राष्ट्रवादीच्या फुटीनंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षाची कसोटी लागणार आहे. भाजपचे विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना स्थानिक आमदारांना सोबत घेऊन मतांची टक्केवारी कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. काँग्रेसचा उमेदवार कोण असेल हे आद्यप निश्चित झालेले नाही. तरीही अशोक चव्हाण हेच उमेदवार असतील, असे ठामपणे सांगितले जात आहे. त्यांना वंचित बहुजन आघाडीची साथ घेऊन काँग्रेसची पारंपरिक मत विभागली जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागणार आहे.

edited by sachin fulpagare

Ashok Chavan, Prakash Ambedkar
Lok Sabha Election 2024 : …अन् खासदारकीपासून ‘वंचित’ राहिलेल्या अशोक चव्हाणांचा जीव भांड्यात पडला!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com