Nanded Loksabha Constituency: 'नांदेड'मध्ये आता 'वसंत'! अमित देशमुखांचा दावा खरा ठरणार का?

Lok Sabha Election 2024 : अशोक चव्हाणसारखा मातब्बर नेता भाजपमध्ये आला असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नांदेडमध्ये सभा घ्यावी लागली होती.
Amit Deshmukh
Amit DeshmukhSarkarnama

Nanded Loksabha Election News : लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील पाचवा आणि अंतिम टप्प्याचे मतदान संपले. पहिल्या टप्प्यात विदर्भ आणि शेवटच्या टप्प्यातील मुंबई वगळता महाराष्ट्रात मतदारांमध्ये उत्साह होता. मराठवाड्यातील आठही लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मराठवाड्यात बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या होत्या. त्यापैकीच एक म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपा प्रवेश.

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची रणनिती ठरवली जात असताना सगळ्याच महत्वाच्या बैठकाना हजर राहिललेले अशोक चव्हाण एक दिवस अचानक भाजपमध्ये गेले. 48 तासात राज्यसभेची उमेदवारी आणि आठवडाभरात अशोक चव्हाण खासदार झाले. विशेषतः नांदेड या आपल्या होमपीचवर अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमुक्तीचा नारा दिला होता. हजारो पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे प्रवेश सोहळे महिनाभर नांदेड जिल्ह्यात सुरू होते.

Amit Deshmukh
Prashant Kishor News : पुन्हा मोदी सरकार आल्यास पेट्रोल, डिझेलवरही GST? प्रशांत किशोर यांचा मोठा दावा

त्यामुळे नांदेड लोकसभेची जागा भाजपच जिंकणार असा दावा सुरुवातीपासून केला जातोय. विद्यमान खासदार व महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांचा भाजपच्या अब की बार चार सौ पार मध्ये प्रताप पाटील चिखलीकरांचा नंबर वरचा असेल, अशी गॅरंटी अशोक चव्हाण यांनी महायुतीच्या प्रचार सभांमधून दिली. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या प्रचाराची मराठवाड्यातील धुरा सांभाळणारे लातूरचे आमदार व माजी मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी नांदेडात आता चव्हाण पण वसंत असा सूचक इशारा दिला होता.

महायुतीने वसंत चव्हाण यांना हलक्यात घेतले होते. पण त्यांच्या सभा आणि उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या मेळाव्याला झालेली गर्दी भाजपच्या गोटात धडकी भरवणारी होती. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये राजकारण केलेल्या वसंत चव्हाण यांनी चिखलीकर-चव्हाण जोडीपुढे मोठे आव्हान उभे केले. नांदेड लोकसभा मतदारसंघ हा राज्यात चर्चेचा ठरला होता तो अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

साहजिकच या मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडेही संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे. अशोक चव्हाण(Ashok Chavan), प्रताप पाटील चिखलीकर यांची या निवडणुकीच्या निमित्ताने प्रतिष्ठा पणाला लागली आहे. चार जूनच्या निकालानंतर केवळ लोकसभेतील उमेदवारांचा निकाल लागणार नाही, तर अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वासाठी हे मोठे चॅलेंज असणार आहे. महाविकास आघाडीने विशेषतः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अमित देशमुख या नेत्यांनी नांदेडवर लक्ष केंद्रीत केले होते.

अशोक चव्हाणसारखा मातब्बर नेता भाजपमध्ये आला असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना नांदेडमध्ये सभा घ्यावी लागली होती. याचे वेगळे अर्थ राजकीय वर्तुळात काढले गले. अशोक चव्हाण, प्रताप पाटील चिखलीकर यांना प्रचारा दरम्यान, मराठा आंदोलकांच्या रोषाला तोंड द्यावे लागले होते.

शिवाय संपूर्ण हयात काँग्रेसमध्ये घालवून मुख्यमंत्री, खासदार व विविध पदे भूषवल्यानंतरही अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडला. याबद्दल नांदेडच्या मतदारांमध्ये नाराजी होती. ती ईव्हीएम च्या माध्यमातून उमटणार असल्याचा दावा विरोधकांकडून केला जातोय. त्यामुळे शंभर टक्के विजयाची गॅरंटी देणाऱ्या महायुतीला चार जूनच्या निकालाची प्रतिक्षा लागली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Amit Deshmukh
Narendra Modi Marathwada Sabha News : मोदींनी सभा घेतलेल्या पाचपैकी चार जागा 'डेंजर झोन'मध्ये ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com