Poisoned By Drinking Ambil: धक्कादायक! नांदेडमध्ये महाप्रसादातून विषबाधा; 200 जण अस्वस्थ

Naigaon Rural Hospital : रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांसह अन्य अधिकारी होते गायब. रुग्ण तळमळत असताना उपचार वेळेवर मिळत नव्हते. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी कुठे आहेत, अशी विचारणा करत रूग्णांच्या नातेवाईकांनी आपला संताप देखील व्यक्त केला.
Naigaon Rural Hospital
Naigaon Rural HospitalSarkarnama

Nanded news : नायगाव तालुक्यातील लालवंडी येथे भंडाऱ्याच्या जेवणात आंबील पिल्याने विषबाधा झाल्याची घटना बुधवारी (ता. 15) सायंकाळी घडली. भंडाऱ्याचे जेवण केल्यानंतर सायंकाळी दीडशे लहान मुलांसह नागरिकांना मळमळ, पोटदुखी सुरू झाल्याने काहींना उपचारासाठी नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर मांजरम प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक गावातच उपचार करत असून, त्रास होत असलेल्या 12 रुग्णांना पुढील उपचारासाठी नांदेडला पाठविण्यात आले आहे.

नायगाव तालुक्यातील लालवंडी येथे गुरुवारी एका शेतकऱ्याच्या (Farmer) शेतातील महादेव मंदिराचा भंडारा होता. या भंडाऱ्यात संपूर्ण गावाचा सहभाग असल्याने प्रत्येकाने योगदान दिले. त्याचबरोबर नागरिकांनी आंबील करून आणली होती. त्यामुळे या भंडाऱ्याच्या महाप्रसादाचा गावातील शेकडो नागरिकांनी लाभ घेतला, त्याचबरोबर आंबील पिले. महाप्रसादाचा लाभ घेतलेल्या काही नागरिकांना सायंकाळी अचानक मळमळ, उलट्या व पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना तातडीने नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Naigaon Rural Hospital
Marathwada Political News : मराठवाड्यातलं मतदान संपताच दानवे, सत्तार, खोतकर, राणापाटलांचं 'चलो मुंबई...'

त्यानंतर नागरिकांना त्रास होऊ लागल्याने जवळपास दीडशे नागरिकांनी उपचारासाठी रुग्णालयात धाव घेतली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला, रुग्णांपेक्षा नातेवाइकांची मोठी गर्दी झाली होती. त्याचबरोबर रात्री उशिरा आणखी काही रुग्ण भरती झाले. हा प्रकार समजल्यानंतर राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान,एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल होत असताना केवळ दोनच वैद्यकीय अधिकारी उपचार करण्यासाठी उपलब्ध होते. वैद्यकीय अधीक्षकांसह अन्य अधिकारी गायब असल्याचे दिसून आले. दाखल रुग्ण तळमळत असताना उपचार वेळेवर मिळत नव्हते. वैद्यकीय अधिकारी कुठे आहेत, अशी विचारणा करत काही रूग्णांच्या नातेवाईकांनी आपला संताप व्यक्त केला.

उपचार करण्यासाठी उपलब्ध वैद्यकीय अधिकारी केवळ दोन आणि रुग्ण दीडशेच्या वर यामुळे मोठी गैरसोय झाली होती.बुधवारच्या विषबाधेच्या घटनेची माहिती वरिष्ठांना कळविण्यात आल्यानंतर गुरुवारी सकाळी वरिष्ठ अधिकारी डॉ. विद्या जैन या तातडीने दाखल झाल्या. गंभीर रुग्णांना नांदेडला (Nanded) हलविण्यासाठी सोबत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली. विषबाधा झालेल्या सर्व रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Naigaon Rural Hospital
Beed News: "मला बीडमध्ये येऊ दिलं नाही तर..." मुंडे बहीण-भावाला जरांगे पाटलांचा इशारा; म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com