Marathwada Political News : मराठवाड्यातलं मतदान संपताच दानवे, सत्तार, खोतकर, राणापाटलांचं 'चलो मुंबई...'

Loksabha Election 2024 : अब्दुल सत्तार, अर्जुन खोतकर हे मुख्यमंत्र्यांचे पुत्र व कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या पदयात्रेत दिसले.
Raosaheb Danve, Arjun Khotkar
Raosaheb Danve, Arjun KhotkarSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील आठही लोकसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया 13 मे रोजी पार पडली. महायुती-महाविकास आघाडीसह वंचित, अपक्ष आणि इतर छोट्या मोठ्या पक्षाच्या उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद झाले आहे. त्यामुळे चार जूनच्या निकालापर्यंत सगळ्याना वाट पहावी लागणार आहे. दरम्यान, मराठवाड्यातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार, नेते, मंत्री, आमदार यांनी मुंबईकडे धाव घेतली आहे.

महाराष्ट्रातील मुंबईसह, नाशिक व इतर मतदारसंघासाठीचा पाचवा आणि शेवटचा टप्पा येत्या 20 रोजी पार पडत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचे देशपातळीवरील नेते मुंबईत प्रचारासाठी दाखल झाले आहेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) रोड शो आणि सभा करत आहेत. अशावेळी मराठवाड्यातील महायुतीच्या नेत्यांनाही मुंबईसह कल्याण, ठाणे या प्रमुख लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी बोलावण्यात आहे.

Raosaheb Danve, Arjun Khotkar
Shivsena News : ठाकरेंचा ताफा जात असताना शिंदेंच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी; कल्याणमध्ये नेमकं काय घडलं ?

यात प्रामुख्याने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तथा लोकसभेच्या जालना मतदारसंघाचे उमेदवार रावसाहेब दानवे (Raosaheb Danve), शिवसेना शिंदे गटाचे उपनेते माजी मंत्री अर्जुन खोतकर, राज्याचे अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार हे आपापल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होताना दिसत आहेत. अब्दुल सत्तार, अर्जुन खोतकर हे मुख्यमंत्र्यांचे पुत्र व कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या पदयात्रेत दिसले.

तर रावसाहेब दानवे यांनी भिवंडी लोकसभेच्या कल्याण (प.) मंडळाच्या बूथ प्रमुख, सुपर वॉरिसर्स, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी आज संवाद साधला. भिवंडी लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ कल्याण (प.) मंडळाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेत जास्तीत जास्त मतदान करुन घ्यावे, असे आवाहन दानवे यांनी केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मंत्री अब्दुल सत्तार कल्याण- डोंबिवली लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ मेळाव्याला उपस्थित होते. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी मागील दहा वर्षात केलेली विकासकामे व सर्वांसाठी सहज उपलब्ध असण्याने ते मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास ते व्यक्त करताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत अर्जुन खोतकर प्रचारात सहभागी झाले आहेत.

याशिवाय तुळजापूर भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील (Rana Jagjitsingh Patil) मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या प्रचारार्थ घाटकोपर येथे जैन समाजातील मतदार बांधवांशी संवाद साधत होते. महायुतीला सर्व स्तरातून प्राप्त होत असलेला प्रचंड प्रतिसाद व नागरिकांमधील निखळ उत्साह हा लोकांच्या मनातल्या निकालाचा पुरावा, असल्याचे राणा पाटील यांनी म्हटले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Raosaheb Danve, Arjun Khotkar
Kalyan Loksabha Election : पंतप्रधान मोदींनी केले श्रीकांत शिंदेंचे कौतुक; काय आहे कारण...?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com