Maharashtra Assembly Election 2024 : मी आमदार झाल्यापासून बदनापूर विधानसभा मतदार संघात मूर्त स्वरूपात विकास दिसत आहे. आपण मला पुन्हा संधी दिल्यास बदनापूर मतदारसंघाला विकासाचे `मॉडेल` म्हणून नावारूपास आणणार, असा दावा बदनापूर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार नारायण कुचे यांनी केला. बाजार गेवराई सर्कलमध्ये मतदारांच्या भेटीगाठी दौऱ्यात कुचे यांनी दहा वर्षात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मतदारांसमोर मांडतांनाच पुन्हा संधी देण्याचे आवाहन केले.
आपण मला दोनदा संधी दिली. मी देखील मायबाप जनतेचा प्रतिनिधी म्हणून अत्यंत प्रामाणिकपणे विकास कामांना प्राधान्य दिले. (Narayan Kuche) मतदार संघात एक हजार सामाजिक सभागृह देणारा मी आमदार आहे. मतदार संघात असे कोणतेही गाव वंचित राहिलेले नाही जिथे मी विकास कामे केलेली नाहीत. उमेदवार कुचे यांनी गेवराई बाजार, ढासला, पिरवाडी, कंडारी बुद्रुक, निकळक आदी गावांनाही दिल्या.
विशेष म्हणजे कुचे यांच्या पत्नी शितल या देखील प्रचारात सक्रीय सहभाग घेऊन त्यांना मदत करत आहेत. निवडणुका लढविणे काही सोपी गोष्ट नाही. त्यात जर विधानसभेची मोठी निवडणूक असेल तर एकट्या उमेदवाराला प्रचार करणे कठीण असते. अर्थात त्यासाठी पक्ष, नेते, कार्यकर्ते जीवाचे रान करतात. मात्र उमेदवाराच्या कुटुंबियांना देखील निवडणुकीच्या रणांगणात उतरावेच लागते.
बदनापूर विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत दिसून नारायण कुचे तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांना निवडणुकीचा दांडगा अनुभव आहे. (BJP) शिवाय दोनदा आमदार राहिल्याने त्यांच्याकडे निवडणूक यंत्रणा कशी राबवावी त्याचे कौशल्य देखील आहे. तसेच प्रचारासाठी महायुतीच्या सर्वच घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांचा प्रचारासाठी जीवाचे राण करीत आहेत.
नारायण कुचे यांच्याकडे मोठा लवाजमा असला तरी कुटुंबीय कुठे स्वस्थ बसू शकतात. त्यांचे ज्येष्ठ बंधू देविदास कुचे मुळात भाजपचे पदाधिकारी असल्याने ते निवडणुकीचे व्यवस्थापन करीत आहेत. आमदार कुचे यांच्या पत्नी जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका शितलताई कुचे, त्यांच्या भावजाई तथा अंबडच्या माजी नगराध्यक्षा संगीताताई कुचे, मुलगा ललित कुचे, पुतण्या उज्ज्वल कुचे असे संपूर्ण कुटुंब मतदार संघ पिंजून काढत आहेत.
महायुतीचे उमेदवार नारायण कुचे यांच्या पत्नी शितलताई कुचे, भाजपच्या महिला तालुकाध्यक्ष अश्विनी पवार आदींसह भाजप महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्या गावागावात जाऊन महिलांशी संवाद साधत आहेत. त्यांना लाडकी बहीण योजना, आमदार कुचे यांनी दहा वर्षात केलेली विकास कामे, राज्यात आपल्या विचारांचे सरकार किती गरजेचे आहे, आमदार कुचे तिसऱ्यांदा विजयी झाल्यास मतदार संघाचा कसा कायापालट करणार आहे, हे मतदारांना पटवून देतांना दिसत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.