NCP News : नांदेड राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घराणेशाही ; राहुल हंबर्डे युवकच्या प्रदेश सरचिटणीस पदी!

Rahul Hambarde appointed as the State Youth Secretary in the Nationalist Congress Party amidst growing concerns over dynasty politics. : काँग्रेस पक्षात असताना अशोक चव्हाण यांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, चव्हाण यांचे मेहुणे माजी मंत्री भास्कर पाटील खतगावकर, त्यांच्या सूनबाई मीनल खतगावकर यांच्यावर पक्ष नेमकी कोणती जबाबदारी देणार?
Nanded NCP News
Nanded NCP NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Politics News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नांदेड जिल्ह्यात 'अच्छे दिन' आले आहेत. पक्ष फुटीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जोरदार दणका बसला. नांदेड जिल्ह्यात महायुतीने विरोधकांना एकही जागा जिंकू दिली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस आणि काही प्रमाणात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून नेते, माजी आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत.

जिल्ह्यातील चार माजी आमदारांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढली आहे. पण ही वाढत असतानाच पद देताना मात्र नेत्यांच्या मुलांचाच विचार केला जात असल्याचे दिसते. काँग्रेसमधून नुकतेच (NCP) राष्ट्रवादीमध्ये दाखल झालेले माजी आमदार मोहन हंबर्डे यांचे चिरंजीव राहुल हंबर्डे यांची राष्ट्रवादी काँग्रेस युवकच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीचे पत्र आमदार तथा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे प्रमुख नेते प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते देण्यात आले.

जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची नव्याने बांधणी केली जात असताना निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा असताना नेते मात्र बाहेरून आलेल्यासाठीच पायघड्या घालत असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नियुक्त्या, प्रवेश या संदर्भात सगळे निर्णय हे (Pratap Patil Chikhlikar) प्रताप पाटील चिखलीकर हे घेतात. त्यामुळे राहुल हंबर्डे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी झालेली निवड ही चिखलीकर यांच्याच मर्जीने झाल्याचे बोलले जाते. यामुळे पक्षात काही प्रमाणात नाराजी असल्याची चर्चा आहे.

Nanded NCP News
Pratap Patil Chikhalikar News : आता कुठेही जाणार नाही सांगणार्‍या प्रताप पाटील चिखलीकरांचे राष्ट्रवादीत वजन वाढले; अजितदादांचा विश्वासही कमावला!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यात आपले बस्तान बसवत असताना कोणत्याही प्रकारची पक्षांतर्गत नाराजी परवडणारी नाही. अशावेळी प्रताप पाटील चिखलीकर व जिल्ह्यातील इतर नेत्यांनी जरा सबुरीने घ्यावे, असे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात चार माजी आमदारांसह महत्वाच्या पदाधिकाऱ्यांचे पक्ष प्रवेश झाले आहेत. या सगळ्यांच्या अपेक्षा अजित पवार आणि प्रताप पाटील चिखलीकर कशा पूर्ण करणार? याकडे ही सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

Nanded NCP News
Bhaskarrao Khatgaonkar Patil Join NCP : कॉंग्रेसला धक्का देत भास्करराव पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश

काँग्रेस पक्षात असताना अशोक चव्हाण यांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, चव्हाण यांचे मेहुणे माजी मंत्री भास्कर पाटील खतगावकर, त्यांच्या सूनबाई मीनल खतगावकर यांच्यावर पक्ष नेमकी कोणती जबाबदारी देणार? यावर पक्षाला आगामी काळात नांदेडमध्ये किती यश मिळणार? हे अवलंबून असणार आहे. राहुल हंबर्डे यांच्यावर पक्षाने युवकांचे संघटन बांधण्याची जबाबदारी प्रदेश सरचिटणीस पद सोपवून टाकली आहे. त्याता ते कितपत न्याय देतात? हे लवकरच स्पष्ट होईल.

Nanded NCP News
Jalna-Nanded Expressway News : अशोक चव्हाणांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जालना-नांदेड समृद्धी महामार्गाचे भवितव्य अंधारात!

प्रताप पाटील चिखलीकर यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले त्यावेळी ज्येष्ठ नेते माजी मंत्री भास्करराव खतगावकर, माजी आमदार मोहन अण्णा हंबर्डे, माजी आमदार अविनाश घाटे, जिल्हाध्यक्ष दिलीप धर्माधिकारी, बाळासाहेब रावणगावकर, जीवन घोगरे, वसंत सुगावे, मोसीन खान पठाण, श्रीधर नागपूरकर, बालाजी शिंदे, माधव चिंचाळे, प्रसाद पवार, शिवा ढांगे, गणेश येरकले, प्रतीक देमनगुंडे यांची उपस्थिती होती.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com