Parbhani NCP News : एकमेकांचे तोंडही न पाहणारे आमदार दुर्राणी-विटेकर चक्क शेजारी-शेजारी...

Sharad Pawar - Ajit Pawar : दुर्राणी यांना पक्षाने विधान परिषदेवर संधी दिली, तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राजेश विटेकर यांनी मोठी मजल मारली.
Parbhani NCP News
Parbhani NCP NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News : राजकारणात नेहमीसाठी कोणीही शत्रू नसते किंवा मित्रही नसते असे नेहमी बोलले जाते. कारण, राजकीय वैर असलेला एखादा नेता भविष्यात मित्रही बनू शकतो किंवा राजकीय मैत्री असलेले कट्टर विरोधकही बनू शकतात. राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणामुळे वरील वाक्प्रचार प्रत्येक ठिकाणी अनुभवास येत आहेत. परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबाजानी दुर्राणी व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर यांच्यातील राजकीय वैमनस्य सर्वश्रुत होते.

मात्र परभणी येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात दोन्ही नेते एकमेकांशेजारी बसले व त्यांच्यात चांगलाच संवादही झाला. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अजित पवार यांचे बंड होण्यापूर्वी जिल्हाध्यक्ष व विधान परिषद सदस्य बाबाजानी दुर्राणी यांचे व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर यांच्यातील राजकीय वैमनस्य नेहमीच दिसून येत होते. दुर्राणी यांचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी घनिष्ठ संबंध, तर राजेश विटेकर हे पूर्वीपासूनच अजित पवार यांचे कट्टर समर्थक आहेत.

Parbhani NCP News
Ajit Pawar : पवारांना वयावरून बोलणारे अजितदादा मोदींना 'रिटायर्ड' व्हा असं म्हणतील का?

दुर्राणी यांना पक्षाने विधान परिषदेवर संधी दिली, तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राजेश विटेकर यांनी मोठी मजल मारली. महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री असताना राजेश विटेकर यांनी जिल्ह्यातील विविध कामांसाठी मोठा निधी खेचून आणला. परिणामी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येसुद्धा विटेकर यांचा चाहतावर्ग वाढू लागला. विटेकर यांच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना डावलण्याचे प्रकार होऊ लागल्याने दुर्राणी आणि विटेकर यांच्यातील दरी रुंदावत गेली.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी परभणी येथे केलेल्या दौऱ्यात राजेश विटेकर यांचे पक्षातील वाढते स्थान अधोरेखित झाले आणि पुढच्या काही दिवसांतच दुर्राणी यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा वरिष्ठांकडे पाठवला. त्यांच्या राजीनामानाट्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली. अखेर पक्षाच्या मुंबई येथील कार्यालयात वरिष्ठांनी बैठक घेऊन या नाट्याचा शेवट केला. दुर्राणी यांनी राजीनामा मागे घेतला. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंड झाले आणि जिल्ह्यात सर्वात प्रथम राजेश विटेकर यांनी अजित पवारांची साथ दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दुर्राणी, खासदार फौजिया खान, माजी आमदार विजय भांबळे यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांना साथ देण्याचे जाहीर केले. विटेकर हे अजित पवार गटाकडे गेल्याने दुर्राणी यांना दिलासा मिळाला खरा. मात्र शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी दुर्राणी यांना होमपीच असलेल्या पाथरीतच तगडे आव्हान दिले. अखेर नाईलाजास्तव दुर्राणी यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला.

राजकीय विरोधक पुन्हा एकाच पक्षात आल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटात अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर येते की काय, अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र दोन्ही नेत्यांनी वैमनस्य विसरून समेट केल्याचे दिसून आले. परभणीचे पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत परभणी येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात दोन्ही नेते एकमेकांशेजारी बसले आणि दोघांत संवाद होऊन हास्यविनोदही झाला. यामुळे संजय बनसोडे यांचा परभणी दौरा पक्षासाठी फायदेशीर ठरला, असे म्हणावे लागेल.

(Edited By Deepak Kulkarni)

R...

Parbhani NCP News
Eknath Shinde Gadchiroli : गडचिरोलीला लवकरच मिळणार दोन मोठे गिफ्ट; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com