Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुलै महिन्यात उभी फूट पडली. अजित पवारांसह आमदारांचा मोठा गट थेट महायुती सरकारमध्ये सहभागी झाला. यात छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे यांच्यासह काही दिग्गज नेत्यांचा समावेश होता. या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाxकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्र स्टेजवर येणे अनेकदा टाळले होते.
पिंपरीतील नाट्यसंमेलनात हे दोन्हीही नेते एकाच मंचावर येणार होते. त्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते. दोघंही एकमेकांविषयी काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण ऐनवेळी पुणे जिल्ह्यातच असूनही पालकमंत्री अजित पवारांनी नाट्यसंमेलनाला दांडी मारली. यानंतर त्यांनी शरद पवारांसह नाट्यसंमेलनात एकाच मंचावर येणे मुद्दामहून टाळल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये शंभरावे दोनदिवसीय अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन 6 व 7 जानेवारी रोजी होत आहे. शरद पवार हे या संमेलनाचे प्रमुख पाहुणे आणि स्वागताध्यक्ष आहेत, तर उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) मुख्य निमंत्रक आहेत. त्यामुळे हे दोन्ही नेते 6 तारखेला उद्घाटनास एका व्यासपीठावर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. पण अजित पवारांनी या संमेलनाला पुणे जिल्ह्यातच असूनही हजेरी लावली नाही. तर पवारांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले.
पुण्यात 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्योगमंत्री उदय सामंत, पाहुणे मंडळी हजर होती. परंतु कार्यक्रमाच्या पत्रिकेत नाव असूनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी येणे टाळल्याचे म्हटले जात आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यातील नाट्यसंमेलनातील अनुपस्थितीवर खुलासा केला होता. आपल्याला या नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनाचे आमंत्रणच मिळाले नव्हते, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. पण पिंपरीतील होत असलेल्या उद्घाटन सोहळ्याला हजर राहणार असल्याची माहिती त्यांनी आयोजकांना कळवली आहे.
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.