
थोडक्यात बातमीचा सारांश :
जालना जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात सुरेश जेथलिया यांच्या प्रवेशावरून जुन्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
भाऊसाहेब गोरे आणि त्यांच्या समर्थकांनी "आम्हाला न्याय द्या" अशा घोषणा देत गोंधळ घातला.
या घटनेमुळे राष्ट्रवादी पक्षात नव्या सदस्यांच्या प्रवेशामुळे जुने कार्यकर्ते उपेक्षित असल्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
Jalna News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीसह महाविकास आघाडी मोर्चे बांधणी करत आहे. सध्या महायुतीने यात बाजी मारली असून नेत्यांच्या प्रवेशासह बैठका आणि मेळावे घेतले जात आहेत. दरम्यान जालन्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा मेळावा झाला. पण या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यासमोरच नाराजीची ठिणगी पडलीय. यामुळे प्रवेश केल्याने नवे चेहरे घेतले जात आहेत. पण यामुळे जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय? होत असल्याची तक्रार आता समोर येत आहे. (Nationalist Party Rally in Jalna Sees Uproar as Old Workers Protest New Entrants, Demanding Justice)
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात रनधुमाळी सुरू झाली आहे. प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या पक्ष बांधणीला लागला आहे. तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन केलं जात आहे. अशाच कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन राष्ट्रवादीने जालना जिल्हात केले होते. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या प्रमुख उपास्थितीत हा मेळावा पार पडला. पण येथे मानपान आणि नाराजी उद्रेक पाहायला मिळाला. सध्या याचीच चर्चा सुरू आहे.
राष्ट्रवादीच्या या मेळ्यात माजी आमदार सुरेश जेथलिया यांच्या भाषणावेळीच भाऊसाहेब गोरे आणि त्यांचे समर्थकांनी गोंधळ घातला. तसेच राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष अरविंद चव्हाण यांचे भाषण सुरु असतानाही जालना शहर जिल्हा अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केल्याचे उघड झाले आहे. भाऊसाहेब गोरे आणि त्यांचे समर्थकांनी ‘आम्हाला न्याय द्या” अशा घोषणा दिल्या. जेथलिया यांच्या पक्ष प्रवेशाने जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची खंत यावेळी बोलून दाखवण्यात आली. यामुळे राष्ट्रवादीत नव्यांच्या प्रवेशाने जुन्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची सध्या चर्चा सुरू आहे
यानंतर तटकरे यांनी भाऊसाहेब गोरे आणि त्यांच्या समर्थकांसह जालना शहर जिल्हा अध्यक्षांनी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी लोकसभा अधिवेशनाच्या अगोदर जिल्हयातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या सोबत बैठक लावण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच त्या बैठकीच्याआधी पक्ष निरीक्षक पाठवले जातील. कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली जाईल. त्यांच्या अडचणी आणि प्रश्न पक्ष जाणून घेईल अशीही ग्वाही दिली.
1. राष्ट्रवादीच्या जालना मेळाव्यात काय घडलं?
जालना जिल्ह्यातील मेळाव्यात सुरेश जेथलिया यांच्या पक्षप्रवेशावरून भाऊसाहेब गोरे आणि समर्थकांनी गोंधळ घातला आणि जुने कार्यकर्ते उपेक्षित असल्याची तक्रार केली.
2. गोंधळ कोणत्या कारणामुळे झाला?
गोंधळ सुरेश जेथलिया यांच्या प्रवेशामुळे झाला. कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे.
3. पक्षाचे वरिष्ठ नेते या विषयावर काय म्हणाले?
मेळाव्यात उपस्थित असलेल्या सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांनी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र अधिकृत प्रतिक्रिया अद्याप दिली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.