Nilam Gorhe : नीलम गोऱ्हे म्हणतात, बाळासाहेब ठाकरे यांनी मोदी-फडणवीस-शिंदेंना शाबसकी दिली असती!

Nilam Ghorhe Reaction On Thackeray Brand : निवडणुका आल्या की ब्रँन्ड आठवतो, मुळात आपण माॅलमध्ये वस्तू खरेदी करायला आलो आहोत का?
Nilam Gohre Reaction On Thackeray Brand News
Nilam Gohre Reaction On Thackeray Brand NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. नीलम गोऱ्हे यांनी दावा केला की बाळासाहेब ठाकरे असते तर मोदी, फडणवीस आणि शिंदे यांच्या कामगिरीवर त्यांनी शाबासकी दिली असती.

  2. त्यांनी स्पष्ट केले की "ब्रँड" या चर्चेला काहीही महत्त्व नाही, कामगिरी हाच खरा मुद्दा आहे.

  3. या विधानानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

Shivsena News : ब्रँड आणि ब्रँन्डी अशा प्रकारची जी चर्चा सध्या राजकारणात दोन्ही बाजूने सुरू आहे, ती निरर्थक आहे. विधानसभा निवडणुकीत किती ब्रँड एकत्र होते, तरी निकाल काय लागला? असे म्हणत शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी विरोधकांना टोला लगावला. निवडणुका आल्या की अशा गोष्टी त्यांना सूचतात, अशी टीकाही त्यांनी केली.

राज्याच्या राजकारणात सध्या कोणता ब्रँन्ड मोठा यावरून महायुती आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) पक्षामध्ये चांगलीच जुंपली आहे. विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा वाद सुरू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा खरा ब्रँन्ड होता इतरांनी ती भाषा करू नये, असे म्हणत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यावरून टोला लगावला. त्याला संजय राऊत यांनी ठाकरे हा एकच ब्रँड बाकी सगळ्या ब्रँडीच्या बाटल्या, असा पलटवार केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे देशात आणि राज्यात जे काम करत आहेत, ते पाहून बाळासाहेबांनी नक्कीच त्यांना शाबासकी दिली असती, असेही त्या म्हणाल्या. या वादावर शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी महाविकास आघाडीला चिमटा काढला. निवडणुका आल्या की ब्रँन्ड आठवतो, मुळात आपण माॅलमध्ये वस्तू खरेदी करायला आलो आहोत का?

Nilam Gohre Reaction On Thackeray Brand News
Nilam Gorhe : उठा जरा..! नीलम गोऱ्हेंच्या पत्रकार परिषदेत राजू वाघमारेंना डुलकी अन् पुढे...

मतदारांना आपली कामे कोण करू शकतो, अडचणीच्या वेळी कोण धावून येऊ शकतो? विकासकामे कोणता पक्ष करू शकतो? हे चांगलं माहित असतं, ब्रँड पाहून काही कोणी मतदान करत नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तीमत्व खूप मोठे होते, त्यांचे काम, विचार राज्याला दिशा देणारे होते. शिवसेनेची मी काँग्रेस होऊ देणार नाही, असे बाळासाहेब नेहमी सांगायचे.

Nilam Gohre Reaction On Thackeray Brand News
Thackeray Brand : "ब्रँड असता तर..."; शिंदेंच्या आमदाराने थेट बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत 'ठाकरे ब्रँड'वर उपस्थित केली शंका

आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काम पाहून बाळासाहेबांनी त्यांचे कौतुक केले असते, तुम्ही चांगले काम करत आहात, अशी शाबासकी दिली असती, असेही नीलम गोऱ्हे म्हणाल्या. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना मोठा फायदा झाला आहे. त्या सक्षम झाल्या, योजनेचा लाभ कोणाला मिळणार याचे नियम, अटी आधीच सांगण्यात आल्या होत्या. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने लाभ घेणारी नावे वगळावीच लागतील, असेही नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

लाडकी बहीण योजना आणली तेव्हाही विरोधकांनी टीका केली आणि आता ही ते टीका करत आहेत. महिलांना सक्षम करण्यासाठी ही योजना प्रभावी ठरली आहे. अनेक महिलांना या योजनेने आधार दिला, या शिवाय महिलांसाठी सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. त्यामुळे विरोधकांनी कितीही टीका केली, तरी महिला त्यांच्या अपप्रचाराला बळी पडणार नाहीत, असेही गोऱ्हे म्हणाल्या.

FAQs

प्र.1. नीलम गोऱ्हेंनी कोणते विधान केले?
➡️ बाळासाहेब ठाकरे यांनी मोदी, फडणवीस आणि शिंदे यांना शाबासकी दिली असती.

प्र.2. "ब्रँड" चर्चेबाबत नीलम गोऱ्हेंचे मत काय आहे?
➡️ त्यांनी ती चर्चा निरर्थक असल्याचे सांगितले.

प्र.3. हे विधान कुणाच्या संदर्भात केले गेले?
➡️ शिवसेनेतील ब्रँड विरुद्ध कामगिरी वादाच्या पार्श्वभूमीवर.

प्र.4. या विधानाचा परिणाम काय होऊ शकतो?
➡️ शिवसेना-शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्ष आणखी तीव्र होऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com