Beed News : विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार गेल्या काही दिवसापासून आता शिगेला पोहचला आहे. सर्वच पक्षाने जोराची तयारी केली आहे. या निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीने मोठी ताकद लावली आहे. सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर टीका करीत असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच बीडमधील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या एकत्रिकरणावर टोला लगावला.
बीड मतदारसंघात बालाघाटवरील जनता नेहमीच खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भूमिकेसोबत राहिलेली आहे. 'इतके दिवस त्यांचे तोंड बघू नका', असे सांगणारे आता या निवडणुकीत माझ्या विरोधात बळजबरीने एकत्र कामाला लागले असल्याची टीका आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत वातावरण चांगलेच तापले आहे.
निवडणुकीच्या तोंडावर आमच्या विरोधक नेत्यांचे मिटलं पण कार्यकर्त्यांचं काय?' असा सवाल करत'ये पब्लिक है, सब जानती है' असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या एकत्रिकरणावर लगावला आहे.
बीडमधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या जयदत्त क्षीरसागर यांनी अचानक निवडणूक रिंगणातून उमेदवारी मागे घेतली. मंगळवारी राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. योगेश क्षीरसागर यांना पाठिंबा जाहीर केला. त्यावर संदीप क्षीरसागर यांनी टिकास्त्र सोडले. गावोगावी जनतेने माझी निवडणूक हाती घेतली आहे. त्यामुळे विरोधकांनी कितीही आगपाखड केली तरी, तुम्हा सर्वांच्या जिवावर आपलाच विजय निश्चित आहे. त्यामुळे विरोधकांच्या टिकांकडे दुर्लक्ष करा, असे आवाहन यावेळी आमदार क्षीरसागर यांनी केले आहे
आजपर्यंत एकमेकांचे तोंडही पाहू नका म्हणणारे सत्तेसाठी पुन्हा एकत्र आले आहेत. मात्र, या भागातील जनता शरद पवार यांच्या विचारांच्या मागे कायम उभी राहिलेली आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच आताही वातावरण आहे. सर्वच जाती-धर्माचे व घटकांच्या मंडळीची साथ राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला असल्याने आपल्याला कोणतीही ताकद थांबवू शकत नाही, असेही संदीप क्षीरसागर यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.