Beed News : "निष्पक्ष चौकशीसाठी राजीनामा द्या"; विद्रोही साहित्य संमेलनात मुंडेंविरोधात ठराव

Dhananjay Munde Resignation : सरपंत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला. छत्रपती संभाजीनगर इथल्या विद्रोही साहित्य संमेलनात ठराव संमत
Santosh Deshmukh, Walmik Karad, Dhananjay Munde
Santosh Deshmukh, Walmik Karad, Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

Beed News : दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी संबंधित मंंत्र्यांनी पदापासून दूर रहावे, असा ठराव छत्रपती संभाजीनगर इथल्या विद्रोही साहित्य संमेलनात संमत करण्यात आला आहे. यापूर्वी मराठवाडा साहित्य संमेलन आणि नवी दिल्ली येथील अखिल भारतीय मराठी संमेलनातही संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणाची चर्चा झाली. एकूणच मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी साहित्य विश्वासतही दबाव वाढल्याचे दिसत आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये आमखास मैदानावर 19 व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला शुक्रवारी सुरुवात झाली. याच संमेलनात सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाचे पडसाद दिसले. तसेच या दोन्ही घटनांबाबत ठरावही मांडण्यात आले.

"परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी दोषी पोलीस आणि संतोष देशमुख कोण प्रकरणातील सत्ता वर्तुळातील पोहोचलेले गुन्हेगार यांना त्वरित शिक्षा करण्यात यावी. निष्पक्ष चौकशी होण्यासाठी नैतिकतेचा भाग म्हणून संबंधित मंत्र्यांनी मंत्रीपदापासून दूर राहावे, असा धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे नाव न घेता ठराव मांडण्यात आला.

Santosh Deshmukh, Walmik Karad, Dhananjay Munde
Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांच्यासाठी आजचा दिवस महत्वाचा; अटकेची टांगती तलवार, काय आहे प्रकरण

यापूर्वी मराठवाडा साहित्य संमेलनातही सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणात पोलिसांची चौकशी व्हावी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी अशाप्रकारचा ठराव संमत करण्यात आला होता. त्यापाठोपाठ नवी दिल्ली येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनातही संतोष देशमुख यांची हत्या, मंत्र्यांचा कथित भ्रष्टाचार, मंत्र्यांच्या हस्तकांची खंडणीखोरी याबाबी मराठवाड्यातील मराठी समाजाला लागलेले ग्रहण आहे. हे चित्र बदलण्यासाठी पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) लक्ष घालावे असा ठराव मराठवाडा साहित्य परिषदेने आणला होता.

Santosh Deshmukh, Walmik Karad, Dhananjay Munde
Anna Hazare on Dhananjay Munde : राज्य सरकारवरील दबाव वाढणार; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून अण्णा हजारेंचे सूचक विधान

मात्र या ठरावाला जोरदार विरोध झाला. महामंडळाने राजकीय आणि सामाजिक वादात पडू नये, अशी भूमिका घेण्यात आली. मात्र अखेर राजकीय नेत्यांसह सर्व उल्लेख थेटपणे टाळून गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त करणारा ठराव संमत करण्यात आला. मात्र आता विद्रोही साहित्य संमेलनात मुंड यांच्या राजीनाम्याची मागणी करणारा ठराव संमत करण्यात आला आहे. पण तिन्ही साहित्य संमेलनांमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत चर्चा झाली. त्यामुळे मुंडे यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढताना दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com