Valmik Karad: वाल्मीक कराडचा 'राखेचा खेळ' खल्लास होताच महाजनको मालमाल : बदललेल्या व्यवस्थेने झाली कोट्यवधींची कमाई

Parli Thermal Power Station, Mahagenco Fly Ash, Valmik Karad: वाल्मिक कराड तुरुंगात गेल्यानंतर परळी औष्णिक केंद्रात पारदर्शक निविदा प्रक्रिया राबवल्यामुळे महाजनकोला राखेच्या विक्रीतून वर्षभरात विक्रमी ३५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, अवैध वाहतुकीला मोठा आळा बसला आहे.
Walmi Karad
Walmi KaradSarkarnama
Published on
Updated on

Parli Thermal Power Station: परळीच्या राखेची अवैध वाहतूक आणि विक्रीतून मालामाला झालेल्या वाल्मीक कराड आणि त्याच्या गुंड टोळक्याची रवानगी वर्षभरापासून तुरुंगात झाली आणि त्याच राखेतून आता सोनं मिळतंय अशी म्हणण्याची वेळ आली. पारदर्शक आणि निविदा प्रक्रियेतून राखेची विक्री कोणाच्याही हस्तक्षेपाशिवाय सुरू झाल्याने परळी औष्णीक केंद्रातील राखेतून महाराष्ट्र राज्य वीज मंडळाला वर्षभरात ३५ कोटींची लाॅटरी लागल्याचे समोर आले आहे.

परळी औष्णीक उर्जा प्रकल्प म्हणजे राख माफियांसाठी पर्वणीच होती. गेल्या अनेक वर्षापासून या राखेची अवैध वाहतूक आणि विक्रीतून जिल्ह्यात मोठे रॅकेट निर्माण झाले. यातून प्रचंड पैसा, संपत्ती आणि दहशत निर्माण करणाऱ्या टोळ्यांनी डोके वर काढले. परंतु मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची खंडणी प्रकरणातून अपहरण आणि निर्घृण हत्या प्रकरणात जिल्ह्यात राजेरोसपणे गुंडगिरी, दहशत माजवणाऱ्या टोळीचा म्होरक्या वाल्मिक कराडसह आठ जणांना मकोका अंतर्गत बेड्या ठोकल्या गेल्या.

Walmi Karad
Parli: परळी हत्याकांडानंतर राजकीय वातावरण गरम : भाजपवर गंभीर आरोप करत बाबाजाणी दुर्राणींकडून मुस्लिम सुरक्षा कायद्याची मागणी

वर्षभरापासून वाल्मिक व त्याचे बगलबच्चे तरुंगात बंद असल्याने परळीच्या राखेलाही चांगले दिवस आले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. परळी औष्णीक उर्जेतून निघणाऱ्या राखेचे मोठे अर्थकारण तालुक्याच्या व जिल्ह्याच्या राजकारणावर परिणाम करणारे ठरते. आतापर्यंत गुंड आणि त्यांच्या टोळ्या या राखेवर राजेरोसपणे डल्ला मारायचे. पण त्यांचे 'आका' जेलमध्ये गेल्यापासून ही राख महाजनकोसाठी सोनं ठरत आहे.

वर्षभरात निविदा प्रक्रियेतून विक्री झालेल्या राखेतून महाजनकोला तब्बल ३५ कोटी रूपयांचे उत्पन्न झाल्याचे समोर आले आहे. मुख्य अभियंता सुनील इंगळे यांच्या प्रयत्नातून अवघ्या दीड महिन्यात दोन प्रकारच्या राख विक्रीतून महाजनकोला दहा कोटींचा महसूल मिळाला आहे.

Walmi Karad
No-Confidence Motion : ओम बिर्लांच्या विरोधात अविश्वास ठराव, पदावरून हटवण्यासाठी किती मतांची आवश्यकता?

२०२५-२६ या वर्षात महाजनकोला ३५ कोटी ९ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. परळी औष्णीक उर्जा केंद्रातून निर्माण होणाऱ्या राखेतून मिळणारे हे तीन वर्षातील सर्वाधिक उत्पन्न आहे. २०२३-२४ मध्ये २१ कोटी २५ लाख, २०२४-२५ मध्ये २६ कोटी ६१ लाख एवढे उत्पन्न महाराष्ट्र राज्य वीज मंडळाला मिळाले होते. यात चालु वर्षात दहा कोटींची भर पडली आहे.

परळी औष्णीक केंद्रातून निघणाऱ्या फ्लाय अॅश आणि पाँड राखेचा वापर सिमेंट, विट भट्टी आणि रस्ते बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. पुर्वी ही राख अवैधरित्या उचलून तिची विक्री केली जायची. परळीतील राजकीय वरदहस्त असलेल्या गुंड टोळ्या ही राख विकून कोट्यावधी कमवायचे. आता या राखेवर पूर्णपणे महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे नियंत्रण असून आता राखेची अधिकृत वाहतूक आणि विक्रीसाठी दोनशेहून अधिक एजन्सी नियुक्त करण्यात आल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com