Shivsena UBT News : एकीकडे निष्ठावंताचे शिव संपर्क अभियान, दुसरीकडे आणखी एका माजी महापौराने साथ सोडली!

former mayor quits the party : माजी महापौर नंदकुमार घोडेले, अनिता घोडेले, कला ओझा, किशनचंद तनवाणी, विकास जैन यांनी याआधीच आपला निर्णय घेत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
EX Mayor Join Shivsena News
EX Mayor Join Shivsena NewsShivsena
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून सुरू असलेल्या आऊटगोईंगला मध्यंतरी ब्रेक लागला होता. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला आणखी एक धक्का बसला आहे. शिवसेनेच्या निष्ठावंतांच्या शिव संपर्क मोहीमेच्या तयारीसाठी शहरात शिबीर सुरू असतानाच आणखी एका माजी महापौराने उद्धव ठाकरे यांची साथ सोडत असल्याची घोषणा केली.

माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी शिवसेनेचे नेते खासदार विनायक राऊत यांच्याकडे आपल्या सहसंपर्क प्रमुख पदाचा राजीनामा देत पक्षाला जय महाराष्ट्र केला. 37 वर्ष शिवसेनेत (Shivsena) महापौर पदासह विविध पद उपभोगल्यानंतर तुपे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे बहुतांश महापौर याआधाची पक्ष सोडून गेले आहेत. काही माजी नगरसेवकांनीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडत मशाल खाली ठेवत धनुष्यबाण हाती घेतला आहे.

माजी महापौर नंदकुमार घोडेले, अनिता घोडेले, कला ओझा, किशनचंद तनवाणी, विकास जैन यांनी याआधीच आपला निर्णय घेत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यात त्र्यंबक तुपे यांच्या रुपाने आणखी एका माजी महापौरांची भर पडली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबाबत माझी कुठलीच नाराजी नाही. परंतु मला जिल्हाप्रमुख करण्याचे दिलेले आश्वासन पाळले नाही, मला वार्डाच्या विकासाचा विचार करणे गरजेचे आहे, असे म्हणत तुपे यांनी आपल्या सहसंपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिला. आता तुपे यांचा लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत पक्षप्रवेश होणार आहे.

EX Mayor Join Shivsena News
Sanjay Raut : अरंर...! आधी छातीठोकपणे दावा, आता निकालविरोधात जाताच संजय राऊत म्हणतात, 'मोठी गडबड...'

ते दोन माजी आमदार कोण?

दरम्यान, सामाजिक न्याय तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी जिल्ह्यातील दोन माजी आमदार लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगीतले. विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख नेते आज छत्रपती संभाजीनगरात आहेत. त्यांच्या उपस्थितीतच निष्ठावंत शिव संपर्क मोहिमेसाठीचे प्रशिक्षण शिबीर पार पडले. खासदार अनिल देसाई, विनोद घोसाळकर, रविंद्र मिर्लेकर हे मुंबईतील नेते शहरात असतानाच पक्षाला पुन्हा धक्का बसला आहे.

EX Mayor Join Shivsena News
Ambadas Danve News : निष्ठावंत शिव संपर्क मोहिमेतून उद्धवसेना पक्षाची नव्याने मोट बांधणार!

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ताकदीने लढण्यासाठी शिवसेना नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आजच निष्ठावतं शिव संपर्क अभियानासाठीच्या प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले होते. जुन्या नव्या शिवसैनिकांची सांगड घालत जिल्ह्यातील सर्व नऊ तालुके आणि शहरातील महापालिकेच्या 115 वार्डांमध्ये तीन टप्प्यात ही मोहीम राबवण्याचे नियोजन केले आहे. कोरोना आणि त्यानंतर राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडी, शिवसेनेत पडलेली फूट या पार्श्वभूमीवर नव्याने संघटनात्मक बांधणीचा निर्धार केला असतानाच तुपे यांच्या राजीनाम्याने या मोहीमेला सुरूवातीलाच धक्का बसला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com