Sanjay Raut : अरंर...! आधी छातीठोकपणे दावा, आता निकालविरोधात जाताच संजय राऊत म्हणतात, 'मोठी गडबड...'

Maharashtra Election 2024 LIVE vote Counting : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू आहे. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात महायुतीचं पारडं जड आहे, तर महाविकास आगाडीची पिछेहट झाल्याचं पाहायला मिळत आहे. निकालाची आकडे समोर येताच ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी निकालावर मोठा संशय व्यक्त केला आहे.
sanjay raut |eknath shinde | devendra fadnavis | ajit pawar
sanjay raut |eknath shinde | devendra fadnavis | ajit pawarsarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Election 2024 LIVE vote Counting : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू आहे. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात महायुतीचं पारडं जड आहे, तर महाविकास आगाडीची पिछेहाट झाल्याचं पाहायला मिळत आहे.

निकालाची आकडे समोर येताच सुरुवातीपासून राज्यात महाविकास आघाडीचंच (Mahavikas Aghadi) सरकार येणार आणि 26 तारखेला आम्ही राज्यात स्थापन करणार असा छातीठोकपणे दावा करणारे ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी निकालावर मोठा संशय व्यक्त केला आहे. (Maharashtra Election Assembly 2024 news)

या निकालात काहीतरी गडबड आहे, हे राज्याला लवकरच कळेल, हा जनतेचा कौल नाही हे मी शंभर टक्के सांगतो, असं म्हणत राऊत यांनी निवडणूक मजमोजणीच्या प्रक्रियेवर शंका व्यक्त केली आहे. राऊत म्हणाले, "जर एकनाथ शिंदेंना 56 जागा अजित पवारांना 40 जागा मिळत असतील तर काहीतरी गडबड आहे. (Vidhan Sabha Election 2024 result live news)

आणि नरेंद्र मोदी, अमित शहांनी राज्यात असे काय दिवे लावलेत ज्यामुळे त्यांना 120 जागा मिळत आहेत. जो कौल जनतेचा होता तो या निकालातून दिसत नाही. आम्ही लोकशाहीचा कौल मानतो पण आता समोर आलेला निकाल आणि कौल कसा मानायचा असा जनतेला प्रश्न पडला आहे."

sanjay raut |eknath shinde | devendra fadnavis | ajit pawar
BJP Politics : आता चंद्रकांत पाटील मुख्यमंत्री होतील... : काँग्रेसच्या बड्या नेत्याचं सूचक वक्तव्य

हा लावून घेतलेला निकाल

तसंच हे निकाल लावून घेतलेले आहेत. जय पराजय होत असतो पण त्याच्याविषयी आम्हाला काय म्हणायचं नाही. पण लोकशाही मानणाऱ्या लोक या निकालावर विश्वास ठेवू शकत नाहीत. शिवाय लाडकी बहीणचा इफेक्ट वगैरे काही नाही. राज्यातील निवडणुकीत अदानींचं बारीक लक्ष होतं.

अदानींच्या विरोधात अटक वारंट निघाल्यानंतर असे निकाल येत आहेत. अदानीवरील आरोप हे अप्रत्यक्षपणे भाजपवर आरोप आहेत. आम्ही ग्राऊंडला फिरत होतो, जनतेचा कौल वेगळा होता. आत्तापर्यंतच्या निकालात कुछ तो गडबड है. हा जनतेचा कौल वाटत नाही, असं म्हणत राऊतांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर शंका व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com