Ajit Pawar News : 'ही बनवाबनवी आणि नौटंकी चालणार नाही', ठाकरेंच्या शिलेदारांवर अजितदादा कडाडले !

Maval Lok Sabha Constituency : मावळात आपल्याला धनुष्यबाणाचेच काम करायचे आहे. ही आपली स्पष्ट भूमिका आहे. यात गडबड करताना कोणी दिसले, तर त्या कार्यकर्त्याचे कामच करून टाकीन, या शब्दांत ..
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Maval News : बारामती लोकसभेची निवडणूक पार पडल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्यास सुरूवात केली आहे. गुरुवारी मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ सभा घेतल्यानंतर अजित पवारांनी मावळचे महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्यासाठी प्रचारसभा घेतली.

या सभेत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह, उत्साही कार्यकर्त्यांना अजितदादांनी कानपिचक्या देत चांगलेच सुनावले. सभेत बोलताना आधीच्या वक्त्यांनी बोलून दाखविलेली खंत याचा धागा पकडत निवडणुकीत गडबड करणाऱ्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी वेळीच सुधारावे, नाही तर त्यांची काही खैर नाही, असा सूचक इशारा अजित पवारांनी यावेळी दिला.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलीचे नुकतेच लग्न झाले. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्वागत समारंभासाठी अजित पवार यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविणारे उमेदवार संजोग वाघेरे देखील हजर होते. या समारंभात वाघेरे यांनी अजित पवार यांचे पाय पकडून आशिर्वाद घेतले असल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.

या प्रकाराचा अजित पवार (Ajit Pawar) यांनी चांगलाच समाचार घेतला. वाघेरे यांचे नाव न घेता अजितदादा म्हणाले,स्वागत समारंभात माझे लक्ष नव्हते. अशा वेळेस विरोधी आघाडीच्या उमेदवाराने पाय पकडून,माझे आशीर्वाद घेतल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करण्याची 'बनवाबनवी' केली. ही बनवाबनवी आणि नौटंकी चालणार नाही. मावळात महायुतीच्या उमेदवाराचे काम करायचे आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajit Pawar
Narendra Dhabholkar Case : दाभोलकरांच्या हत्येचं समर्थन करणाऱ्या वकिलाला न्यायाधीशांनी फटकारलं; नेमकं काय घडलं?

आमदार बनसोडे यांच्या मुलीच्या स्वागत समारंभासाठी गेलो होतो. माझे त्याच्याकडे लक्ष नव्हते. पण तो टपूनच बसला होता. माझे पाय पकडून पठ्ठ्याने फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला. जणू अजितदादांचा आपल्याला आशीर्वाद आहे, असा बनाव त्याने केला. ही नौटंकी चालणार नाही. मावळात (Maval) आपल्याला धनुष्यबाणाचेच काम करायचे आहे. ही आपली स्पष्ट भूमिका आहे. यात गडबड करताना कोणी दिसले, तर त्या कार्यकर्त्याचे कामच करून टाकीन, या शब्दांत अजित पवारांनी दम देखील भरला.

केंद्र शासनाकडून भविष्य काळात मोठ्या प्रमाणात निधी मिळवायचा असेल तर मावळातून आपल्या विचारांचे श्रीरंग बारणे पुन्हा खासदार होणे आवश्यक आहे. 'एक घाव, दोन तुकडे' हा माझा स्वभाव आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचे काम करताना लक्ष देऊन करा. विरोधक सोशल मिडीयाचा वापर करून आपल्यामध्येच दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतो. मात्र त्याकडे लक्ष देऊ नका. आपल्यावर दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पूर्ण करा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

Ajit Pawar
Amol Kolhe's Announcement : डॉ. अमोल कोल्हेंची मोठी घोषणा; पुढची पाच वर्षे अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार

मावळ लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचे काही कार्यकर्ते, पदाधिकारी दिवसा धनुष्यबाण आणि रात्री मशाल चालवितात, असा आरोप आमदार सुनील शेळके यांनी केला. अशा पदाधिकाऱ्यांची निकालानंतर पोलखोल करणार असल्याचा इशारा शेळके यांनी दिला. भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंनी सुरुंग विरोधकांना लावायचा आहे, महायुतीला नाही ना? असा प्रतिप्रश्न शेळकेंना विचारला.तर महायुतीचे काम सर्वांनी एकत्र येऊन करावे, असे साकडे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भाजप , राष्ट्रवादीसह घटक पक्षांना घातले.

Ajit Pawar
Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांची तिहार तुरुंगातून सुटका, 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com