Chhatrapati Sambhajinagar: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला लागले आहे.त्यात बैठका, मेळावे,गाठीभेटी, दौरे यांच्याद्वारे मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यातच इनकमिंग -आऊटगोईंगनेही वेग पकडला आहे.
महाविकास आघाडीसह महायुतीतही आरोप- प्रत्यारोप, हेवेदाव्यांनी राजकारण तापवलं असून पळवापळवी सुरु झाली आहे. त्यातच विरोधकांना धक्के देण्याबरोबरच आता महायुतीत एकमेकांना झटके दिल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
कन्नडचे माजी आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते नितीन पाटील (Nitin Patil) यांनी राजकीय वर्तुळासह सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कन्नड मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गट विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट अशी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
मुंबईत अजित पवारांच्या (Ajit Pawar) उपस्थितीत देवगिरी बंगल्यावर पक्षप्रवेश केला आहे.माजी आमदार नितीन पाटील यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात सोमवारी (ता.29) प्रवेश केला आहे.आधीच जागावाटपावरुन महायुतीत खटके उडत असतानाच आता एकमेकांचे संभाव्य उमेदवार पळवण्याचा धक्कादायक प्रकार सुरू केला आहे.
कन्नड विधानसभा निवडणुकीत महायुतीतील शिवसेना शिंदे गटाकडून नितीन पाटील हे संभाव्य उमेदवार असल्याचे बोलले जात होते. त्यांना तसा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शब्दही देण्यात आला होता.
मात्र, काही दिवसांतच पडद्यामागं अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आणि पाटलांनी थेट देवगिरी बंगलाच गाठला.पाटील यांचा अजित पवार गटातला प्रवेश शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.