Ambadas Danve On PM Modi: मोदींचे अवास्तव उदात्तीकरण कशासाठी ? दानवेंची मुख्यमंत्र्यांवर टीका...

Marathwada Political News : सरकारने फक्त ही अकरा कलमी योजना घोषित करून बोलघेवडेपणा केला.
Ambadas Danve- CM Eknath Shinde News
Ambadas Danve- CM Eknath Shinde NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी `नमो` अभियानाची घोषणा केली. या अंतर्गत राज्यात अकरा कलमी कार्यक्रम राबवण्याचेही जाहीर केले. नेमकं यावर बोट ठेवत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकार नरेंद्र मोदींचे अवास्तव उदात्तीकरण करत असल्याची टीका केली.

Ambadas Danve- CM Eknath Shinde News
Ashok Chavan On Reservation : तरुणांनो, आयुष्य संपवून नाही, जनमताचा दबाव वाढवून मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल...

राज्य सरकारचा अकरा कलमी कार्यक्रम म्हणजे बोलघेवडेपणा असल्याचेही दानवे यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले. (Eknath Shinde) मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या योजनांपैकी बहुतांश योजना या महाविकास आघाडी व काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात सुरू होत्या. (PM Modi) त्या योजनांचे फक्त नामांतर करण्यात आले असून, या योजनांमध्ये सामान्य व गरीब लोकांच्या विकासासाठी कोणत्याही तरतुदी करण्यात आलेल्या नाहीत.

नमो महिला सशक्तीकरण योजनेअंतर्गत ७३ लाख महिलांना विविध योजनांचा लाभ देण्याचे शासनाने ठरविले आहे. परंतु प्रत्यक्षात प्रमोद महाजन महिला कौशल्य योजना महिलांचे सक्षमीकरणासाठी यापूर्वी सुरू होती. (Shivsena) तसेच ७३ हजार शेततळे उभारण्यात येणार आहेत. यापूर्वीसुद्धा मागेल त्याला शेततळे योजना सुरू होती. त्यामुळे सरकारने फक्त ही अकरा कलमी योजना घोषित करून बोलघेवडेपणा केला असल्याचा आरोप दानवे यांनी केला.

देशात यूपीएचे सरकार असताना गांधी घराण्यातील विविध व्यक्तींवर सुरू करण्यात आलेल्या योजनांवरती सध्याच्या केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आक्षेप घेतलेले आहेत. जर काँग्रेसच्या काळामध्ये शासकीय योजनांना व्यक्तीचे नावे देणे अयोग्य ठरत असेल, तर त्यांना दिलेला न्याय भारतीय जनता पक्षालासुद्धा लागू होतो.

कोणालाही वेगळा न्याय लावणे योग्य नसून सर्वांना समान वागणूक मिळाली पाहिजे. ५४ हजार बांधकाम कामगारांनी शासकीय योजनेच्या लाभासाठी केलेल्या अर्जांपैकी १३ हजार बांधकाम कामगारांना मार्च २०२३ पर्यंत मदत मिळाली नाही. त्यामुळे ७३ हजार बांधकाम कामगारांना नमो कामगार कल्याण अभियानांतर्गत संच वाटप हा कार्यक्रम कामगारांची दिशाभूल करणारा असल्याची टीकाही अंबादास दानवे यांनी केली.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com