Amit Deshmukh On Ladki Bahin Yojana : आता निवडणुका नसल्याने कदाचित पुढच्या लोकसभेआधी लाडक्या बहिणींना 2100 रुपये जाहीर करतील!

MLA Amit Deshmukh appeals against depriving any sister of Ladki Bhain Yojana, calling it a form of fraud : विधानसभा निवडणुका असल्याने तेव्हा एकाही अर्जा त्रुटी न काढता तुम्ही मंजूरी दिली. मग आता त्यांना बाद ठरवणे म्हणजे लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही का? त्यावेळी पात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींना आता अपात्र न ठरवता सगळ्यांना अनुदान मिळाले पाहिजे.
MLA Amit Deshmukh News
MLA Amit Deshmukh NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : महायुती सरकारने एकाही लाडक्या बहिणीचा अर्ज बाद करू नये, ती त्यांची फसवणूक होईल. विधानसभा निवडणुकीतील विजयात याच लाडक्या बहिणींचा मोठा वाटा होता, अशी कबुली सरकारने वारंवार दिली आहे. त्यामुळे आता नियम व अटी सांगून जे अर्ज बाद करण्याचे प्रकार सरकारकडून सुरू आहेत, ते तात्काळ थांबवावे, त्यांची फसवणूक करू नये, असे आवाहन काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी सरकारला केले.

विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर लाडक्या बहिणींच्या पंधराशे रुपयांच्या अनुदानात वाढ करून ते 2100 करु, असे आश्वासन दिले गेले. पण आता कुठल्याही मोठ्या निवडणुका नाहीत, त्यामुळे कदाचित 2029 च्या लोकसभेआधी या संदर्भातला निर्णय महायुतीचे सरकार घेईल, असा टोलाही देशमुख (Amit Deshmukh) यांनी लगावला. लातूर या आपल्या मतदारसंघातील एका कार्यक्रमात अमित देशमुख यांनी लाडकी बहीण योजनेतून हजारो, महिलांना अपात्र ठरवले जात आहे, यावर त्यांनी भाष्य केले.

विधानसभा निवडणुका असल्याने तेव्हा एकाही अर्जा त्रुटी न काढता तुम्ही मंजूरी दिली. मग आता त्यांना बाद ठरवणे म्हणजे लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही का? त्यावेळी पात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींना (Ladki Bahin Yojana) आता अपात्र न ठरवता सगळ्यांना अनुदान मिळाले पाहिजे. त्रुटी आहे असे माहित असताना जर तेव्हा तुम्ही योजनेचे अर्ज मंजूर केले तर ते आता कोणत्या सबबीवर बाद करत आहात. आमचे याकडे लक्ष आहे, सरकारने लाडक्या बहिणींची फसवणूक करता कामा नये? याकडे देशमुख यांनी लक्ष वेधले.

MLA Amit Deshmukh News
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये कधी? आदिती तटकरेंची कोंडी, शेवटच्या क्षणी फडणवीस, पवार अन् शिंदेंकडे दाखवले बोट

लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. खून, दिवसा चोऱ्या, रस्त्यावर मारहाण अशा घटना या चिंता वाढवणाऱ्या आहेत. या संदर्भात जिल्हा प्रशासन आणि राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावरही या गोष्टी घालण्यात आल्या आहेत. ते यावर तातडीने अंकुश मिळवण्याच्या दृष्टीने पावले उचलतील, असा विश्वासही देशमुख यांनी व्यक्त केला.

MLA Amit Deshmukh News
Amit Deshmukh News : देवेंद्र फडणवीस, अजित पवार या दोघांनी मिळून मराठवाडा वाॅटर ग्रीड प्रकल्प पाच वर्षात पूर्ण करावा!

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्याने प्रशासनावर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही. त्यामुळे शहरात काही प्रमाणात नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. आम्ही सातत्याने या संदर्भात प्रशासकांशी बोलतो आहोत. लातूरकरांना कुठल्याही अडचणीचा सामना करावा लागू, नये याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत, असेही देशमुख म्हणाले.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com