संभाजीनगरच्या सरकारी विश्रामगृहात अलिशान सूट रिकामी, मुख्यमंत्र्यांना खासगी हॉटेलचा आधार!
"मनुष्यबळच नाही!" – फडणवीसांना सरकारी सूटऐवजी खासगी हॉटेलमध्ये थांबावे लागले
संभाजीनगरात सरकारी सूट बंद, मुख्यमंत्र्यांची खासगी हॉटेलमध्ये राहण्याची वेळ
अलिशान सरकारी सूट पडूनही उपयोगात नाही, मुख्यमंत्र्यांचा खासगी हॉटेलकडे मोर्चा
संभाजीनगरात मुख्यमंत्र्यांना सरकारी सूटऐवजी खासगी हॉटेलची निवड का करावी लागली?
सुनील इंगळे
Government Guest House : छत्रपती संभाजीनगरमधील सुभेदारी शासकीय विश्रामगृहाच्या आवारात मुख्यमंत्री यांच्या मुक्कामासाठी नव्याने व्हीव्हीआयपी सूट बांधून तयार आहे. येथील सुविधांवर तब्बल तेरा कोटी खर्च करण्यात आले. मात्र, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी शहरात काल रात्री मुक्कामी आलेल्या देवेंद्र फडणवीस यांचे पाय काही या सुसज्ज सूटला लागले नाही. केवळ मनुष्यबळ नसल्यामुळे येथे यंदाही मुख्यमंत्र्यांचा मुक्काम होऊ शकला नाही.
सुभेदारी विश्रामगृहाच्या आवारात मे 2025 मध्ये बांधण्यात आलेल्या इमारतीत पाच व्हीव्हीआयपी सूट उभारण्यात आले आहेत. यात दुसरा मजला म्हणजे 'रायगड'. या सूटमध्ये मुख्यमंत्री, (Chief Minister) सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि राज्यपाल व कॅबिनेट मंत्री यांच्या थांबण्यासाठीची व्यवस्था करण्यात आली आहे. राजवाड्याप्रमाणेच असलेल्या या इमारतीच्या बांधकामासाठी आठ, तर सजावटीसाठी दोन कोटींच्या जवळपास खर्च झाला.
एकूण खर्च 13 कोटी 18 लाख 63 हजार रुपये करण्यात आला. पण एवढा खर्च करूनही केवळ मनुष्यबळ नसल्याने छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) मधील सूटचा वापर होत नाही. परिणामी मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री व व्हिआयपी गेस्ट हे खासगी महागड्या हाॅटेलमध्ये थांबतात. मग शासकीय विश्रामगृहातील कोट्यावधीच्या खर्चाचे काय? असा प्रश्न निश्चितच पडतो. शासकीय विश्रामगृहांच्या देखभाल दुरूस्तीवर कोट्यावधी रुपये वेळोवेळी खर्च केले जातात. पण यातील सूटचा वापर किती मंत्री,अधिकारी करतात? हा संशोधनाचा विषय आहे.
छत्रपती संभाजीनगर सुभेदारी विश्रामगृहातील मुख्यमंत्री व इतर व्हीआयपींसाठी राखीव सूटवर असाच खर्च करण्यात आला आहे. यात स्थापत्य कामावर 8 कोटी 5 लाख, अंतर्गत सजावटीवर 1 कोटी 71 लाख, तर विद्युत कामांवर 3 कोटी 83 लाख रुपये खर्च करण्यात आला. दरम्यान, इमारतीचे काम पूर्ण झाले. सूटची स्वच्छता करण्यात आली आहे, परंतु, मनुष्यबळच नाही.
यासंदर्भात टेंडर काढण्यात आले असून या प्रक्रियेला जवळपास महिना लागणार आहे. यात कुक, रूम बॉय, सफाई असे जवळपास 30 ते 40 मनुष्यबळ लागणार आहे. परंतु, सध्या हे मनुष्यबळ भरले नसल्यामुळे अद्याप एकही सूट बुक झालेला नाही. येथे मनुष्यबळ असते तर मुख्यमंत्री यंदा या 'सूट'मध्ये थांबले असते.
अशी आहे रचना
-बेसमेंट मजल्यावर वाहनतळ, वाहनचालकांसाठी कक्ष, इलेक्ट्रिक रूम.
-तळ मजला : दोन व्हीव्हीआयपी सूट, स्वयंपाक व भोजन कक्ष (30 व्यक्ती), पुरुष-महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे.
-पहिला मजला : एक व्हीव्हीआयपी कक्ष, कॉन्फरन्स हॉल (80 व्यक्ती), प्री-फंक्शन लॉबी, सार्वजनिक स्वच्छतागृहे.
-दुसरा मजला : एक मुख्यमंत्र्यांचा कक्ष, एक व्हीव्हीआयपी कक्ष, टेरेस रूफ गार्डन. याशिवाय प्रत्येक मजल्यावर जाण्यासाठी लिफ्ट, इलेक्ट्रिक रूम आदी सुविधा आहेत.
प्र.1. मुख्यमंत्री फडणवीस खासगी हॉटेलमध्ये का थांबले?
सरकारी सूट मनुष्यबळाअभावी वापरात नसल्याने त्यांना खासगी हॉटेलमध्ये मुक्काम करावा लागला.
प्र.2. सरकारी सूट कुठे आहे?
हा सूट छत्रपती संभाजीनगरमध्ये सुभेदारी शासकीय विश्रामगृहात आहे.
प्र.3. सूट वापरात का आली नाही?
मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने सूट बंद ठेवली होती.
प्र.4. या घटनेचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
विरोधक सरकारी निष्काळजीपणावरून सरकारवर निशाणा साधू शकतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.