Ambadas Danve News : मुंबईच नाही, संपूर्ण महाराष्ट्र ठाकरेंचाच!

Ambadas Danve asserts that not only Mumbai but the entire state of Maharashtra stands with the Thackeray legacy. : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी महाराष्ट्रात लढा उभारावा लागेल. उद्धव ठाकरे यांनी सत्ता येताच दोन लाखांची कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली होती. महायुती सरकारला मात्र दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे.
Uddhav Tahckeray, Ambadas Danve News
Uddhav Tahckeray, Ambadas Danve NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पहिल्याच कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांच दोन लाखाचं कर्जमाफ केलं होतं. निवडणुकीत उद्धवसाहेबांनी शेतकऱ्यांना आश्वासन नाही तर वचन दिलं होत. एका अंगठ्याच्या निशाण्यावर सत्तेत येताच आपण शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं होतं. आणि म्हणून फक्त मुंबईच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रचं ठाकरेंचा आहे, असा दावा शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी केला. महायुती सरकारला कर्जमाफीच्या आश्वासनाचा विसर पडला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह सगळ्या प्रश्नावर महाराष्ट्रात लढा उभारावा लागेल, असे आवाहनही अंबादास दानवे यांनी केले.

शिवसेनेच्या 59 व्या वर्धापनदिना निमित्त मुंबईत आयोजित मेळाव्यात अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मार्गदर्शन केले. मराठवाड्यात नुकत्याच राबवण्यात आलेल्या 'क्या हुआ तेरा वादा' या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील जन आंदोलनाला मिळालेले यश आणि ते पाहता हे आंदोलन राज्यभरात करण्याची कशी गरज आहे, हे अंबादास दानवे यांनी नेते आणि शिवसैनिकांच्या निदर्शनास आणून दिले. उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांची दोन लाखांची कर्जमाफी दिली होती, ती ही कुठल्याही जाचक अटी, कागदपत्रांशिवाय केवळ एका अंगठ्यावर.

आताच्या महायुती सरकारला मात्र कर्जमाफीच्या आश्वासनाचा विसरल पडला आहे. मराठवाड्यात कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर आम्ही आंदोलन केले. साडेसहा हजार गावांपैकी चार 4190 गावामध्ये ग्रामसभेत निवेदन दिले. (Shivsena UBT) 1080 गाव बैठका आम्ही मराठवाड्यात घेतल्या. तालुकास्तरावर टॅक्टर, बैलगाडी मोर्चे काढले. 70 तालुक्यात आम्ही हे आंदोलन केले. शेवटच्या स्तरावर चक्काजाम आंदोलन केलं आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवला.

Uddhav Tahckeray, Ambadas Danve News
Ambadas Danve Letter News : बाळासाहेब ठाकरे आमच्या संघटनेचा बाप आहे; परत लढू, परत जिंकू! शिवसैनिकांना खुले पत्र..

यामुळे शिवसैनिकाला आंदोलनं मिळालं, शिवसैनिकांमध्ये उत्साह वाढला, तो हिरमुसला होता. शिवसैनिकांना कार्यक्रम दिला तर ते कोणाचाही कार्यक्रम करू शकतात, असेही अंबादास दानवे म्हणाले. आता पुढचे आंदोलन पीक कर्जासाठी करणार आहोत. सरकार सांगते बँका पीक कर्ज देताना शेतकऱ्यांचे सीबील तपासणार नाही. पण हे सरकार खोट बोलतयं, सीबील व इतर कारणांमुळे दोन-दोन महिने शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या फायली पडून आहेत. येत्या 23 तारखेला आम्ही बँकांमध्ये जाऊन याचा जाब विचारणार आहोत.

Uddhav Tahckeray, Ambadas Danve News
Uddhav Thackeray strategy : सत्ता गेली, साथीदार गेले पण ‘हे’ नेते ठरणार मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे गटाचे ब्रह्मास्त्र!

एक रुपयात पीक विमा योजना सरकारने बंद केली आहे, पीक विम्याचे दोन वर्षापासूनचे पैसे मिळालेले नाहीत. शेतकरी सन्मान योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणारा सरकारचा एक रुपयाही गेल्या काही महिन्यापासून जमा झालेला नाही. पंतप्रधान सौर उर्जेसाठी राज्यातील शेतकऱ्यांचे साडेसहा हजार कोटी रुपये जमा आहेत. पण त्यांना सौर उर्जेची वीज मिळालेली नाही. जी वीज दिली जाते ती शेतकऱ्यांना रात्री दहा ते पहाटे चारच्या दरम्यान दिली जाते. त्यातही तास-दोन तास वीज बंद असते, असा दावा अंबादास दानवे यांनी केला.

Uddhav Tahckeray, Ambadas Danve News
ShivSena Vardhapan Din : उद्धव ठाकरेंनी टायमिंग साधलं! गुजरात पॅटर्नपुढे झुकणार नाही म्हणत वर्धापनदिनीच राज ठाकरेंना साद तर शिंदेंवर घणाघात

निवडणुका येतात आणि जातात पण शिवसेनेचे धोरण 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हे आहे. मराठवाड्यात आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केलेल्या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. शेतकरी गाव बैठकांमध्ये आले, आपली भुमिका मांडत होते. अजूनही शेतकऱ्यांचे प्रश्न कायम आहेत. दोन वर्षापासून पीक विमा नाही, खत-बी बियाण्यांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. नुकसान भरपाई देताना एनडीआरएफचे निकष सरकारने आता पुन्हा बदलले आहेत. अशावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरचा लढा आपल्याला व्यापक प्रमाणावर लढावा लागेल. संपूर्ण महाराष्ट्रात हा लढा उभारण्याची गरज असल्याचे दानवे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com