Uddhav Thackeray strategy : सत्ता गेली, साथीदार गेले पण ‘हे’ नेते ठरणार मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे गटाचे ब्रह्मास्त्र!

Thackeray group key leader News : येत्या काळात होत असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत कोण वरचढ ठरणार यावरून रस्सीखेच पाहवयास मिळणार आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आली असल्याने सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. एकीकडे एकसंध असताना शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेली मुंबई महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजप व ठाकरेंच्या शिवसेनेत जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळत आहे. या दोन्ही पक्षाकडून आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रणनीती आखली जात आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुका गेल्या तीन वर्षांपासून झालेल्या नाहीत त्यामुळे सध्या प्रशासक राज्य आहे. या काळात भाजप व शिंदे शिवसेनेने वर्चस्व प्रस्थापित करीत ठाकरे सेनेचे अनेक माजी नगरसेवक गळाला लावले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत भाजप-शिंदे सेनेचे वर्चस्व राहील, असे वाटत असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेने रणनीती बदलली असून सत्ता गेली, साथीदार गेले. तर आता मुंबई जिंकण्यासाठी शाखाप्रमुखांचे ब्रह्मास्त्र बाहेर काढले आहे. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत कोण वरचढ ठरणार यावरून रस्सीखेच पाहवयास मिळणार आहे.

शिवसेनेच्या (Shivsena) संघटनात्मक रचनेत शाखाप्रमुख हे अत्यंत महत्त्वाचे पद आहे. हे पद म्हणजे एकप्रकारे पक्षाचा कणा समजला जातो. शाखाप्रमुख हे वॉर्डनिहाय असतात. त्याशिवाय, शाखाप्रमुखांचा स्थानिक पातळीवरील जवळपास प्रत्येक प्रश्नांत सक्रिय सहभाग असतो. त्यामुळे येत्या काळात उद्धव ठाकरे यांनी नेहमीच त्यांच्यासॊबत एकनिष्ठ राहिलेल्या शाखाप्रमुखांची बैठक घेत रणनीती आखली आहे.

Uddhav Thackeray
Jayashree Patil Joins BJP: बंडखोर नेत्या जयश्री पाटील यांचा भाजप प्रवेश; चंद्रकांतदादांचा काँग्रेससह अजित पवारांना धक्का

जून 2022 मध्ये शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंड केले. त्यावेळी अनेक आमदार, खासदार तसेच नेत्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांची साथ सोडली होती. मात्र, स्थानिक पातळीवरील बहुतांश शाखाप्रमुख हे ठाकरे यांच्यासोबतच राहिल्याचे चित्र आहे. स्थानिक नागरिकांमध्ये त्यांचा थेट संपर्क आहे. त्यामुळे यावेळेसच्या महापालिका निवडणुकीतही उद्धव ठाकरे पक्षाचे शाखाप्रमुखच महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे या महापालिका निवडणुकीसाठी शाखाप्रमुखानी मदतीला घेत ठाकरे सेनेने वेगळी रणनीती आखली आहे.

Uddhav Thackeray
Bhaskar Jadhav: 'आम्हाला एबी फॉर्म देऊन वाऱ्यावर सोडता,मग लढायचं कसं?'; उद्धव सैनिकांनी भास्कर जाधवांनाच धारेवर धरलं

आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लवकरच लागणार असल्याने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर रविवारी ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाच्या सर्व शाखाप्रमुखांची बैठक पार पडली. दुसरीकडे महायुतीमधील घटक पक्षाकडून मुंबई पालिका निवडणुकीची तयारी केली जात आहे. भाजपने ही निवडणूक स्वबळावर लढणार की एकत्रित लढणार याबाबतचे पत्ते अद्याप ओपन केले नाहीत. त्यामुळे या निवडणुकीसाठी काय रणनीती असणार हे पुढे आलेले नाही.

Uddhav Thackeray
Shivsena Politics : भरत गोगावलेंनी रश्मी ठाकरेंवर निशाणा साधताना घेतले एकनाथ शिंदेंच्या पत्नीचे नाव ; म्हणाले, 'वहिनी कधी...'

त्यातच गेल्या काही दिवसापासून पालिका निवडणुकीपूर्वी राज व उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, राज ठाकरे व सीएम देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याने मनसे व शिवसेना ठाकरे गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा सध्या तरी थांबल्या आहेत. त्यामुळे आता आगामी काळातील होत असलेल्या निवडणुकीसाठी मनसेची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Uddhav Thackeray
Raj Thackeray On Kundmala Bridge : कुंडमळा दुर्घटनेनंतर राज ठाकरे सरकारवर बरसले, 'निष्काळजी...'

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण यांसारख्या सुविधा देतानाच सागरी किनारा मार्गासारखे महत्त्वाचे प्रकल्प आम्ही मुंबईकरांना दिले. मुंबईकरांना आम्ही सर्व करून दाखवले असताना सत्ताधाऱ्यांनी मात्र हे सगळे गमावून दाखवले. त्यामुळे हीच गोष्ट मतदारांच्या लक्षात आणून द्या आणि विधानसभा निवडणुकीत झालेली चूक दुरुस्त करा,’ असा कानमंत्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाखाप्रमुखांच्या बैठकीत दिला आहे.

Uddhav Thackeray
Raj-Uddhav Thackeray Unity : राज-उद्धव ठाकरेंच्या ऐक्यासाठी परदेशात झळकला बॅनर, व्हिएतनाममध्ये दिला आगळावेगळा संदेश

येत्या महापालिका निवडणुका विरोधकांना धडा शिकविण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असल्याने सर्व पातळीवरील कार्यकर्त्यांना सक्रिय करतानाच सर्वांनी एकजूट दाखवावी. शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, विभागप्रमुख, विधानसभा संघटक, महानगरप्रमुख यांनी आपआपल्या प्रभागातील बूथप्रमुख, वॉर्डप्रमुख, उपविभागप्रमुख, विभागप्रमुख यांच्या स्तरावर बैठका आयोजित करून तात्काळ कामाला सुरुवात करण्याची सूचना उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत. ठाकरेंनी बैठकीवेळी वेगवेगळ्या सूचना देत शिवसैनिकाना बळ दिले.

Uddhav Thackeray
Ajit Pawar : 'वसंतदादा, विलासरावही साखर कारखान्याचे चेअरमन होते, मलाही ‘माळेगाव’चे चेअरमन व्हायचंय'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com