High Court News : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना खंडपीठाची नोटीस..

Notice to Leader of Opposition Vijay Wadettiwar of Aurangabad Bench : कॉंग्रेस कार्यकर्ता अविनाश चव्हाण यांनी थेट विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे तक्रार केली. जगदीश खट्टर यांच्या विरोधात फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल असल्याने त्यांचे मद्य परवाने रद्द करावेत, असे तक्रारीचे स्वरुप होते.
Bombay High Court bench Aurangabad
Bombay High Court bench AurangabadSarkarnama
Published on
Updated on

Congress Leader Vijay Wadettiwar News : कॉंग्रेस कार्यकर्त्याच्या तक्रारीवरुन विधानसभेचे विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी दारुचे दुकाने बंद करण्याचे पत्र राज्य उत्पानदन शुल्क आयुक्तांना दिले होते. त्यानंतर दुकान बंद करण्याची कारवाई सुरु झाली. या विरोधात दाखल झालेल्या याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती वाय. जी. खोब्रागडे यांनी कारवाईला स्थगिती देत, राज्य शासनासह विरोधात पक्षनेता विजय वडेट्टीवार यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.

जालना येथील व्यावसायिक जगदीश खट्टर यांचे शहरात देशी आणि विदेशी मद्य विक्रीचे दोन परवानाधारक दुकाने आहेत. त्यांच्यावर दाखल असलेल्या पुर्वीच्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने कॉंग्रेस कार्यकर्ता अविनाश चव्हाण यांनी थेट विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्याकडे तक्रार केली. जगदीश खट्टर यांच्या विरोधात फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल असल्याने त्यांचे मद्य परवाने रद्द करावेत, असे तक्रारीचे स्वरुप होते.

या तक्रारीची दखल घेत वडेट्टीवार यांनी तात्काळ राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांना पत्र दिले. त्यानंतर आयुक्तांनीही तक्रारीच्या अनुषंगाने जालना जिल्हाधिकारी यांना पत्र दिले. विरोधी पक्षनेत्यांच्या पत्रानुसार खट्टर यांचे मद्य परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यास सांगितले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी राज्य उत्पादन शुल्क अधिक्षकांना कारवाई करण्याचे निर्देश दिले.

Bombay High Court bench Aurangabad
High Court : जात वैधता प्रमाणपत्रा संदर्भात खासदार काळगे यांना खंडपीठाची नोटीस..

त्यानुसार अधिक्षकांनी चौकशी करुन अहवाल सादर केला. त्यावरुन जिल्हाधिकारी यांनी सुनावणी घेतली आणि निकाल राखून ठेवला. (High Court) या विरोधात खट्टर यांनी ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांच्या कारवाईला तसेच विरोधी पक्ष नेत्याने दिलेल्या पत्राला आव्हान दिले.

फौजदारी कारवाई प्रलंबीत असली म्हणून मद्य परवाना रद्द करण्याची कुठलीच तरतूद नसल्याचे ठोंबरे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईला स्थगिती देत राज्यशासन, विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार, जिल्हाधिकारी यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 26 सप्टेंबर रोजी ठेवण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com