Imtiaz Jalil: आता शिवसेना आमच्या मागे! भाजपची खेळी यशस्वी; संभाजीनगरमधील मोठ्या यशानंतर इम्तियाज स्पष्टच बोलले

Imtiaz Jalil: एकेकाळी शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
Imtiaz Jalil
Imtiaz JalilSarkarnama
Published on
Updated on

Imtiaz Jalil: एकेकाळी शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर एमआयएम आहे तर शिवेसेना तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. याला भाजपचीच खेळी कारणीभूत असल्याचा आरोप एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी केला आहे. यासाठी त्यांनी अनेक बाबी स्पष्टपणे सांगितल्या आहेत. यामध्ये भाजप ५६ जागांवर आघाडीवर असून शिवसेना १४ तर एमआयएमला १८ जागांवर आघाडीवर आहे.

Imtiaz Jalil
Praniti Shinde: सोलापूरमध्ये प्रणिती शिंदेंना मोठा धक्का! स्वतःच्या प्रभागातच भाजपचे चारही उमेदवार विजयी; अशा झाल्या लढती

जलील म्हणाले, "औरंगाबादच्या विजयानं आम्ही खूपच आनंदी आहोत, आम्हाला विजयाचा पूर्ण विश्वास होता. हैदराबादनंतर देशात एमआयएमला लोकांनी जवळून स्विकारलं असेल तर ते औरंगाबाद शहर आहे. इथून एक आमदार दिला होता, एक खासदार दिला होता. पण जेव्हा लोक सांगत होते की, एमआयएम आता औरंगाबादमधून संपली आहे, तिथंच एमआयएम आता भाजपनंतर दुसरा मोठा पक्ष झाला आहे.

पण भाजपचं जिंकणं हे स्वाभाविक आहे, त्यांच्याकडं पैसा होता. त्यांच्याकडं पूर्ण ताकद होती. पण भाजपचं एक लक्ष होतं संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना शिवसेनेला संपवायचं होतं. एकनाथ शिंदेंची शिवसेना त्यांना संपवायची होती. ज्या कारणासाठी त्यांनी युती तोडली त्यात ते यशस्वी ठरले आहेत. आता शिवसेना आमच्या मागे आहे, त्यांचा एक पालकमंत्री, आमदार, खासदार, सहा आमदार आहेत आमचं काय वाकडं केलं त्यांनी?"

Imtiaz Jalil
Avinash Bagwe: अविनाश बागवेंना मोठा धक्का! अटीतटीच्या लढाईत अवघ्या ४५ मतांनी पराभूत; फेरमोजणी नंतर...

तुमच्या सभांमध्ये एमआयएमवर सातत्यानं टीका व्हायची. इम्तियाज जलील टार्गेट असायचं, आता लोकांनी तुम्हाला उत्तर दिलं आहे. ज्या एमआयएमला तुम्ही म्हणायचे की, हा जातीयवादी पक्ष आहे. आज हिंदु महिलांना आणि एससी-एसटी समाजातील उमेदवारांना आम्ही निवडून आणलं आहे. म्हणजेच सर्वसामान्य जनतेला आम्ही निवडून आणलेलं आहे. हे सर्वसामान्य लोकांचं यश असून ज्यांनी आम्हाला या स्थानावर पोहोचवलं आहे त्यांना आम्ही धन्यवाद देतो, असंही जलील यांनी म्हटलं आहे.

तसंच शहराच्या विकासासाठी जर भाजपनं चांगलं काम केलं तर त्यांना आम्ही पाठिंबा देऊ. पण 'समांतर पाणी पुरवठा योजना' आणून भाजपचा छुपा अजेंडा जर तुम्ही जनतेवर थोपवणार असाल तर याविरोधात आम्ही विरोधीपक्षाची भूमिका चांगली बजावू. संपूर्ण महाराष्ट्रात एमआयएमचे १०० हून अधिक नगरसेवक जिंकलेले असतील असा मला विश्वास आहे, असंही इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शिवसेनेची मोठी पिछेहाट झाल्यानं यावर शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी देखील भाष्य केलं आहे. त्यांनी म्हटलं की, महापालिकेचं गणित वेगळंच आहे. संख्याबळाच्या आधारावर त्यांची संख्याजर १० टक्क्यांहून अधिक असेल तर त्यांना विरोधीपक्ष नेतेपद द्यावच लागेल. माझी मुलं जिंकली याचा मला फार काही आनंद नाही. पण माझ्या पक्षाचं नुकसान झालं याच मला दुःख आहे. कुठेतरी कमी पडलो आहोत आम्ही. मुलगा किंवा मुलगी निवडून येणं हे माझं टार्गेट नव्हतं. पण पक्ष हे माझं टार्गेट होतं. त्यानुसार पक्षानं विजय मिळवणं हे माझं ध्येय होतं पण त्यात मी निश्चितच कमी पडलो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com