Praniti Shinde: सोलापूरमध्ये प्रणिती शिंदेंना मोठा धक्का! स्वतःच्या प्रभागातच भाजपचे चारही उमेदवार विजयी; अशा झाल्या लढती

BJP Wins All Four Seats in Praniti Shinde’s Ward: प्रणिती शिंदे सोलापुरात ज्या भागात राहतात तो महापालिकेत त्या प्रभागात भाजपनं मुसंडी मारली आहे.
Praniti Shinde Faces Major Setback in Solapur Elections
Praniti Shinde Faces Major Setback in Solapur ElectionsSarkarnama
Published on
Updated on

Solapur Municipal Election Results: सोलापूरच्या काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांना महापालिका निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. कारण प्रणिती शिंदे सोलापुरात ज्या भागात राहतात तो महापालिकेत प्रभाग क्रमांक २३ आहे. या प्रभागात भाजपनं मुसंडी मारली आहे.

तर काँग्रेसच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. म्हणजेच आपल्या होमग्राऊंडवरच प्रणिती शिंदेंना काँग्रेसला वाचवता आलेलं नाही. त्यामुळं प्रणिती शिंदे यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. तर दुसरीकडं भाजपनं सोलापूरची जबाबदारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर सोपवली होती. त्यांनी आपली कमाल दाखवली आहे.

Praniti Shinde Faces Major Setback in Solapur Elections
Avinash Bagwe: अविनाश बागवेंना मोठा धक्का! अटीतटीच्या लढाईत अवघ्या ४५ मतांनी पराभूत; फेरमोजणी नंतर...

सोलापूर महापालिकेत भाजपनं स्वबळावर निवडणूक लढवली तर काँग्रेस मित्रपक्षांसह मविआ म्हणून या ठिकाणी निवडणूक लढवली. त्यामुळं भाजपला टक्कर देण्यासाठी मविआतील तिन्ही पक्ष एकत्र येऊन लढत होते.

त्यामुळं प्रणिती शिंदे राहतात त्या प्रभाग क्रमाक २३ मध्ये भाजपचं चार उमेदवारांचं पॅनेल उभं होतं. तर मविआकडून शरद पवारांच्या काँग्रेसनं यांचा एक उमेदवार, काँग्रेसचा एक उमेदवार तर उद्धव ठाकरेंचे दोन उमेदवार या प्रभागात उभे होते.

Praniti Shinde Faces Major Setback in Solapur Elections
BMC Election Results 2026: 'डॅडी'चा बालेकिल्ला असलेल्या दगडी चाळीतच दोन्ही मुलींचा पराभव

दरम्यान, चौथ्या फेरीनंतर या प्रभागात भाजपनं मोठी आघाडी घेतली होती, यामध्ये प्रभाग २३-अ मधून सत्यजीत वाघमोडे (भाजप) यांना ७०७५ हजार मतांनी आघाडीवर होते. २३-ब मध्ये आरती वाकसे (भाजप) ९२१३ मतांनी आघाडीवर, २३-क मध्ये ज्ञानेश्वरी देवकर (भाजप) ७८१८ मतांनी आघाडीवर होते, तर २३-ड मध्ये मल्लिकार्जुन राजशेखर (भाजप) हे ७७८२ मतांनी आघाडीवर होते. त्यामुळं जसजशा फेऱ्या वाढत गेल्या तसा भाजपच्या उमेदवारांची आघाडी मजबूत होत जाऊन त्यांचा विजय झाला आहे.

Praniti Shinde Faces Major Setback in Solapur Elections
Vidarbha Mahanagarpalika Elections Result Live : नागपूरसह अकोल्यात भाजपची सत्ता, चंद्रपुरात काँग्रेसची बाजी, अमरावतीत काँटे की टक्कर

भाजपच्या विरोधात प्रभाग २३-अ मधून सुनिता रोटे (शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस), प्रभाग २३-ब मधून दिपाली शहा (काँग्रेस), प्रभाग २३-क मधून (ठाकरे शिवसेना) तर प्रभाग २३-ड मधून लक्ष्मण जाधव (ठाकरे शिवसेना) हे मविआचे उमेदवार मैदानात होते.

पण या सर्व उमेदवारांचा इथं पराभव झाला आहे. यामुळं मविआला मोठा धक्का बसला असून या निवडणुकीत प्रणिती शिंदेंची जादू दिसून आली नाही. उलट शिवसेना आणि काँग्रेसमधील वादाची पार्श्वभूमी याला होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com