Beed News : राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात सगेसोयरे या शब्दाची व्याख्या बदलून, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी २६ जानेवारी रोजी अधिसुचना जाहीर केले आहे. यामुळे ओबीसी समाजामध्ये भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. हा निर्णय ओबीसींवर अन्याय करणारा असून, कुणबी प्रमाणपत्र वाटपाला स्थगिती द्यावी, अशी मागणी करत विविध ओबीसी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. (Latest Marathi News)
राज्य सरकारची अधिसुचना मूळ ओबीसींवर अन्याय करणारा आहे. त्याचबरोबर शिंदे समितीला घटनात्मक मूल्य नसताना देखील, शिंदे समितीच्या शिफारशीवरून कुणबी प्रमाणपत्र देणे हे घटनाबाह्य आहे. याला विरोध दर्शवण्यासाठी सकल ओबीसी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. (Beed OBC Reservation News)
कोणत्याही राज्य किंवा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला मागास ठरविलेले नसताना न्यायमुर्ती (निवृत्त) संदीप शिंदे या मर्यादीत समितीच्या शिफारशीवरून प्रशासनाकडून मराठा कुणबी प्रमाणपत्राचे वितरण केले जात आहे. न्यायमुर्ती सुनील सुक्रे, ओमप्रकाश जाधव व प्रा. अंबादास मोहिते या मराठा आरक्षण या विषयाबाबत आसक्ती असलेल्या व्यक्तिंच्या मागासवर्ग आयोगावर नियुक्त्या कशा केल्या, असा सवालही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
'सध्याची सर्व्हेक्षणाची प्रश्नावली व त्याची उत्तरे समाज माध्यमांवर प्रसारीत करणे म्हणजे मास कॉपी करण्यासारखा हा गंभीर प्रकार आहे. येनकेनप्रकारे मराठा समाजाला मागास ठरवण्याचा अट्टाहास घटनेला अभिप्रेत असेल्या सामाजिक न्यायाचे तत्वे पायदळी तुडवण्याचा प्रयत्न आहे,' असा आरोपही करण्यात आला.
मराठा समाजाच्या दबावाला बळी पडून सरकारने घेतलेल्या या बेकायदेशीर आणि मागासवर्गीयांसाठी अन्यायकारक असलेल्या या निर्णयाला आमचा विरोध आहे, असे म्हणत आंदोलकांनी घोषणाबाजी केली. राज्य मागासवर्ग आयोग व न्यायमूर्ती शिंदे समिती रद्द करावी, मराठा - कुणबी किंवा कुणबी मराठा प्रमाणपत्रांच्या वितरणाला स्थगिती द्यावी, तसेच ओबीसी, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचे आरक्षण वाचवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.