OBC Reservation : उमरग्यात तब्बल 34 वर्षांनी ओबीसी समाज रस्त्यावर; मराठा आरक्षणाबाबत मोठी मागणी

Umarga OBC : राज्यातील गोरगरीब ओबीसी, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचे आरक्षण वाचवा..
OBC Reservation
OBC ReservationSarkarnama

Dharashiv Political News : मराठा आरक्षणासंदर्भातील तयार केलेला अधिसूचनेचा मसूदा रद्द करावा, राज्य मागासवर्ग आयोग व न्यायमूती शिंदे समिती रद्द करावी, तसेच चुकीच्या कार्यपद्धतीने मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा प्रमाणपत्रांच्या वितरणालाही स्थगिती द्या, अशी मागणी ओबीसी आरक्षण बचाव समितीने उमरगा तहसिल व उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढत केली. विशेष म्हणजे मंडल आयोगाच्या आंदोलनानंतर उमरग्यात 34 वर्षांनी ओबीसी समाज रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले.

राज्यातील गोरगरीब ओबीसी, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचे आरक्षण वाचवा, अशी घोषणाबाजी यावेळी आंदोलकांनी केली. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वाखाली 26 जानेवारीला लाख मराठा आंदोलकांनी मुंबईत धडक दिली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः आंदोलकांना सामोरे गेले. त्यांनी मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटलांच्या सगळ्या मागण्या मान्य करत असल्याचा अध्यादेशच सोपवला. त्यानंतर राज्यभरात उलटसुलट चर्चांना उधाण आले.

OBC Reservation
Dhananjay Munde : सावकारी जाचातून शेतकऱ्यांची सुटका होणार; कशी, ते कृषीमंत्री मुंडेंनी सांगितलं

ओबीसी (OBC) समाजामध्ये या अधिसूचनेच्या मसु्द्याविरोधात मोठा रोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी उमरगा येथे ओबीसी आरक्षण बचाव समितीने मोर्चा काढला होता. हा मोर्चा हुतात्मा स्मारकापासून तहसील व उपविभागीय कार्यालय असा होता. यावेळी धनगर समाजाने ढोल ताशे वाजवत, तर मसनजोगीस पोचाम्मा हे पारंपारिक वेशभूषेत मोर्चात सहभागी झाले होते. एकच पर्व ओबीसी सर्व, आमची जात ओबीसी, आमचा पक्ष ओबीसी, अशा घोषणा यावेळी मोर्चेकरांनी दिल्या. त्यानंतर ओबीसींच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे मागण्यांचे निवेदन दिले.

OBC Reservation
Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणावरून महायुतीला नडले, पण बजेटवर नरमले; भुजबळ नेमकं काय म्हणाले ?

यानिमित्ताने उमरग्यात तब्बल 34 वर्षानंतर ओबीसी समाज रस्त्यावर उतरल्याची चर्चा होत आहे. यापूर्वी मंडल आयोगाच्या (Mandal Ayog) शिफारशी लागू करण्याच्या मागणीसाठी साधारणतः 1988-89 मध्ये उमरग्यात माजी खासदार दिवंगत बापूसाहेब काळदाते, कॉम्रेड राम बाहेती यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉम्रेड अरूण रेणके, विठ्ठल सगर, डॉ. दामोदर पतंगे, प्रा. दत्तात्रेय पटवारी, अॅड. दिलीप सगर आदींच्या पुढाकाराने ओबीसींचा मेळावा घेण्यात आला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करण्यासाठी माजी नगराध्यक्ष पोपटराव सोनकांबळे, रेणके यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर गुरुवारी 34 वर्षांनी हक्काचे आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी ओबीसी बांधव रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसून आले.

(Edited by Sunil Dhumal)

OBC Reservation
Prakash Ambedkar Reaction on Budget : सरकारने दिलेली माहिती संशयास्पद; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com