Omraje Nimabalkar : दोन हात करायची वेळ आणू नका, आम्ही कमी पडणार नाही...

शिवसेनेचे पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यांमध्ये आघाडीचा धर्म पाळला जातो, मात्र बीडमध्ये असे चित्र नसल्याचे म्हटले आहे. (Omprakashraje Nimbalkar)
Mp Omprakashraje Nimbalkar
Mp Omprakashraje NimbalkarSarkarnama
Published on
Updated on

बीड : उस्मानाबेदत आम्ही आघाडीचा धर्म प्रामाणिकपणे पाळतो, तिथे कुठलीही तक्रार नाही. पण तुमच्या बीडमध्ये असे दिसत नाही, अशा शब्दात खासदार ओमराजे निंबाळकर (Omprakashraje Nimbalkar) यांनी राष्ट्रवादीवर टीका केली. (Beed) आम्ही तुम्हाला डिस्टर्ब करत नाही, तुम्ही आम्हाला करू नका. (Shivsena) दोन हात करायची वेळ आलीच तर शिवसेना कुठेच मागे हटणार नाही, असा इशारा देखील निंबाळकर यांनी दिला.

शिवसंपर्क मोहिमे दरम्यान, ओमराजे निंबाळकर काल बीड जिल्ह्यात होते. यावेळी त्यांनी शिवसेनेचे पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यांमध्ये आघाडीचा धर्म पाळला जातो, मात्र बीडमध्ये असे चित्र नसल्याचे म्हटले आहे. राज्याच्या सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये कुरबुरी सुरू झाल्या आहेत.

शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर, श्रीरंग बारणे आणि आता ओमराजे निंबाळकर यांनी देखील राष्ट्रवादी विरोधात सूर काढला. त्यामुळे भविष्यात महाविकास आघाडीत बिघाडी होते की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. बीडमध्ये बोलतांना ओमराजे निंबाळकर यांनी आक्रमक पावित्रा घेत थेट राष्ट्रवादीशी दोन हात करण्याची तयारी असल्याचा इशाराच देवून टाकला.

निंबाळकर म्हणाले, महाविकास आघाडीचा धर्म पाळला जात नाही, निधी देतांना दुजाभाव केला जातो. आमच्या जिल्ह्यात असा प्रकार नाही, आम्ही तिथे आघाडीचा धर्म पाळतो. त्यामुळे इथे तुम्ही आम्हाला डिस्टर्ब करू नका, आम्ही तुम्हाला डिस्टर्ब करत नाही. पण दोन हात करायची वेळ आली तर आम्ही देखील कमी पडणार नाही, हे देखील लक्षात ठेवा, असे म्हणत राष्ट्रवादीला ठणकावले.

Mp Omprakashraje Nimbalkar
विरोधक नको म्हणून त्यांनी वडिलांना संपवले, पण दुसरा पवनराजे म्हणून मी उभा ठाकलो...

लोक आपल्याकडे फार आशेने पाहतात, रात्री-बे रात्री फोन करणाऱ्या लोकांवर चीडू नका, त्याची अडचण काय आहे? ते विचारून ती सोडवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला आलेला फोन म्हणजे त्या व्यक्तीने तुमच्यावर दाखवलेला विश्वास असतो, त्याला कदापी तडा जाऊ देऊ नका, असेही निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com