Dharashiv Election 2029 : ओम राजेनिंबाळकरांचे चॅलेंज अंबादास दानवेंनी स्वीकारलं…धाराशिवमधून खासदारकीची निवडणूक लढणार? एकनाथ शिंदे यांच्या सेनेसमोरील अडचणी वाढणार

Dharashiv Politics News : तीन महिन्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून निवडून आलेल्या सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या सेनेत प्रवेश केला. त्यामुळे पुन्हा एकदा टीकेची धार वाढली आहे.
om rajenimbalkar, ambadas danve
om rajenimbalkar, ambadas danve Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : शिवसेनेत उभी फूट पडल्यापासून दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून एकमेकांवर टीका टिपणी करण्याची एकही संधी दोन्ही पक्षाकडून सोडली जात नाही. तीन महिन्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून निवडून आलेल्या सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या सेनेत प्रवेश केला. त्यामुळे पुन्हा एकदा टीकेची धार वाढली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकताच धाराशिवच्या दुष्काळी भागाचा पाहणी दौरा केला त्यावेळी खासदार ओम राजेनिंबाळकर यांचा फोटो ट्विट करीत कोण होतास तू काय झालास तू अशी टीका आमदार अंबादास दानवेंनी फोटो ट्विट करीत केली. त्या टिकेला उत्तर देताना राजेनिंबाळकर यांनी दानवेंना 2029 ला धाराशिवमधून निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले होते. एकदा जनतेतून निवडणूक लढवावी म्हणजे स्वतःची लायकी कळेल, अशी टीका त्यांनी केली होती. ते आव्हान स्वीकारत अंबादास दानवे यांनी राजेनिंबाळकर विरोधात निवडणूक लढण्याचा इशारा दिला आहे. पक्षाने सांगितले तर धाराशिवमधून निवडणूक लढवणार, महाराष्ट्रात कुठूनही निवडणूक लढू शकतो, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

गेल्या दोन दिवसापासून उद्धव ठाकरे (Uddhva Thackeray) यांच्या सेनेचे आमदार अंबादास दानवे व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगला आहे. दोघेही एकमेकांवर टीका टिपण्णी करीत आहेत. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच दानवे यांनी राज्य सरकारच्या कारभारावर पुन्हा एकदा सडकून टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाताना दोऱ्या किंवा बॅरिकेट्स लावून दौरा करतात, मुख्यमंत्र्यांना कशाची भीती आहे. तुम्हाला लोकांची भीती आहे. याचा अर्थ सरळ आहे की, लोकांमध्ये तुमच्या बाबतीत अस्वस्थता आहे, अशी टीका त्यांनी फडणवीस यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर केली.

आदित्य ठाकरे हे दोन दिवसात आठ जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. आदित्य ठाकरे हे बांधावर जाऊन शेतकर्‍यांच्या भेटी घेऊन त्यांना दिलासा देणार आहेत. 1972 च्या दुष्काळापेक्षा यंदाचा दुष्काळ मोठा आहे, असे दानवे म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळी दौऱ्यात मुख्यमंत्री कोणाला भेटले हा शेतकर्‍यांना पडलेला प्रश्न आहे. ज्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री भेटले त्यांच्याशी संवाद साधला असा शेतकरी मला दाखवावा. त्या भेटीला अर्थ असतो तसा तर मुख्यमंत्र्यांचा दौरा हेलिकॉप्टर मधूनही झाला असता. दुष्काळी पाहणी करताना शेतकऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी बोललं पाहिजे होतं. शेतकऱ्यांशी बोलायची मुख्यमंत्र्यांची हिंमत नाही, असे अंबादास दानवे (ambadas danve ) म्हणाले.

कर्नाटक सरकारने आधीच दुष्काळ जाहीर केला आहे. आमची मागणी आहे, विशेष अधिवेशन सरकारने बोलवावं. कर्नाटक सरकारने 177 तालुक्यात दुष्काळ जाहीर केलाय. ज्या काँग्रेसवर टीका करतात त्याच काँग्रेसने विशेष अधिवेशन बोलवले. विशेष अधिवेशनात त्या त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी विषय मांडतात. याला सामोरे जाण्याची हिंमत राज्य सरकारमध्ये नाही भाजप आमदार अमित साटम यांच्याबाबत बोलायला आता मला शब्द नाहीत, असे अंबादास दानवे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com