Letter to PM Modi : ओमराजेंचे पंतप्रधान मोदींना पत्र; केली 'ही' मागणी

MP Om RajeNimbalkar : शिवरायांचा इतिहास नव्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील
Om RajeNimbalkar
Om RajeNimbalkarSarkarnama

An Oil Painting of Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नवीन पिढ्यांना प्रेरणा देणारा आहे. त्यामळे नवीन संसद भवनात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य असे तैलचित्र लावावे, अशी विनंती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पत्र पाठविले आहे.

Om RajeNimbalkar
Sangola News : सत्कारासाठी आयोजकांनी साळुंखेंचे नाव पुकारले; मात्र दीपकआबांनी प्रशांत परिचारकांसाठी आग्रह धरला...

खासदार राजेनिंबाळकर (Om RajeNimbalkar) यांच्या पत्रात नवीन संसद भवनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्र लावण्याची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी कारणही स्पष्ट केले आहे. राजेनिंबाळकर म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराज हे भारतातील महान राज्यकर्त्यांपैकी एक आहेत. भारताच्या नौदल सैन्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात केली होती. या सैन्याने इंग्रज, फ्रेंच, डच इत्यादी पाश्चात्य देशांतील व्यापाऱ्यांवर दबदबा निर्माण केला होता. त्यामुळेच भारतीय नौदलाच्या पायाभरणीचे श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांना जाते."

Om RajeNimbalkar
Khaire Visit Affected Farm : पिकं गेली, घरं पडली, जनावरे दगावली; शेतकऱ्यांचा किती अंत पाहणार ?

पत्रात खासदार निंबाळकर यांनी शिवाजी महाराजांनी लोकशाहीची अनेक मूल्ये रुजविल्याचाही उल्लेख केला आहे. खासदार राजेनिंबाळकर म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराज हे त्या काळातील सर्व राज्यकर्त्यांमध्ये एक आदर्श शासक होते. त्यांच्या कार्यकाळात अष्टप्रधान मंत्रिमंडळ होते. त्या मंत्रीमंडळाद्वारे राज्य करणारे शिवराय पहिले शासक होते. लोकशाहीची अनेक मूल्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रात आढळतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य येणाऱ्या पिढ्यांनी लक्षात ठेवावे असेच आहे. त्यामुळे नवीन संसद भवनात शिवरायांचे भव्य तैलचित्र बनविणे गरजेचे आहे."

Letter of Omraje Nimbalkar
Letter of Omraje NimbalkarSarkarnama

यानंतर त्यांनी शिवरायांच्या तैलचित्र बनविण्यासाठी योग्य तो निर्णय घेण्याचीही विनंती केली आहे. खासदार राजेनिंबाळकर म्हणाले," छत्रपती शिवाजी महाराजांचे नवीन संसद भवनात भव्य तैलचित्र बनवणे आवश्यक आहे. त्यामुळे नवीन संसद भवनात तैलचित्र काढण्याबाबत आपल्या स्तरावर योग्य तो निर्णय घ्यावा, ही विनंती आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com