Sushma Andhare On Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे सूट काय, त्यांची खुर्चीही हिंदुत्वासाठी कुर्बान करतील, अंधारेंची टीका

Kangana Ranaut Vs Sushma Andhare : सरकारी निवासस्थान मिळेपर्यंत खासदार कंगना रनौत महाराष्ट्र सदनात राहणार असल्याची चर्चा होती. महाराष्ट्र सदनातील रूमची त्यांनी पाहणी केली होती. मात्र इतर रूम छोट्या असल्याने त्यांनी थेट मुख्यमंत्री सूट मिळावा अशी मागणी केली..
Kangana Ranaut- Sushma Andhare
Kangana Ranaut- Sushma AndhareSarkarnama

Beed News : भाजपच्या खासदार कंगना रनौत यांनी लोकसभेत केलेल्या मागणीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनावले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचा सुटच काय ? तर ते त्यांची खुर्ची देखील हिंदुत्वासाठी कुर्बान करतील. त्यांनी हिंदुत्वासाठी ते करावं, असं म्हणत खासदार कंगना रनौत यांच्या लोकसभेतील मागणीवर अंधारे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना टोला लगावला आहे.

अंधारे म्हणाल्या, लोकसभेचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनामध्ये बातमी आम्ही ऐकली, की ज्या पद्धतीने हिमाचल प्रदेश मधून निवडून आलेल्या कंगना रनौत यांनी, स्वतंत्र सूट च मागणी केली, आणि त्यांच्याकडे सूट उपलब्ध नाही,यामुळे त्यांनी महाराष्ट्र सदन मधील मुख्यमंत्र्यांचा सूट मिळावा, अशी मागणी केली. तर दुसरीकडे हिंदुत्वासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एवढे वाहून घेतले आहे,की कंगना रनौत यांना त्यांचा सुटच काय, तर गरज पडली तर त्यांची खुर्ची सुद्धा कुर्बान करतील.यामध्ये त्यांनी मागे हटू नये आणि हिंदुत्वासाठी त्यांनी हे सर्व केलं पाहिजे.

Kangana Ranaut- Sushma Andhare
Bajrang Sonwane : बजरंग सोनवणेंनी संसदेच्या पायऱ्यांवर डोकं टेकलं; 'या' घटकांना शपथ केली अर्पण

कंगना रनौत (Kangana Ranaut) यांनी खासदारकीची शपथ घेतल्यानंतर त्या महाराष्ट्र सदनात गेल्या होत्या. यानंतर त्यांनी दिल्लीत राहण्यासाठी महाराष्ट्र सदनातील रूमची चाचपणी केली होती. सरकारी निवासस्थान मिळेपर्यंत कंगना महाराष्ट्र सदनात राहणार असल्याची चर्चा होती. महाराष्ट्र सदनातील रूमची पाहणी केली होती. मात्र इतर रूम छोट्या असल्याने त्यांनी थेट मुख्यमंत्री सूट मिळावा अशी मागणी केली होती. यावर ठाकरे गटाच्या नेत्या अंधारे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांनाच सुनावले आहे.

Kangana Ranaut- Sushma Andhare
Video Omraje Nimbalkar : खासदार ओमराजेंसाठी मंगलम योग...

नुकत्याच झालेल्या पावसात अयोध्येतील राम मंदिरात पावसाच्या पाण्याची गळती झाली. यावर देखील अंधारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, 22 जानेवारीला जगभरात वाजत गाजत ज्या राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा केला, त्या राम मंदिरात पहिल्याच पावसात गळती होत असेल तर हे अतिशय लज्जास्पद आहे. मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवर देखील त्यांनी टीकेची झोड उठविली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com