अडीच वर्षे फक्त नारळ पाणी पिले; आता नारळं फोडून सत्ता मागतायेत..

कार्यकर्ते सांभाळता येत नाहीत ते शहर सांभाळण्याच्या गप्पा मारू लागलेत, कप्रतिनिधी पदाला खेळ समजू नका, आमच्यातला आणि तुमच्यातला फरक जनतेने ओळखला आहे. (Beed Municipal Council)
Dr.Yogesh-Mla Sandeep Kshirsagar, Beed
Dr.Yogesh-Mla Sandeep Kshirsagar, BeedSarkarnama

बीड : अडीच वर्षे बेपत्ता होऊन नारळाचे पाणी पीत बसलेले आता नारळ फोडून बीड नगरपालिका (Beed Municipal Council) ताब्यात द्या म्हणातात, असा टोला लगावत, बीडच्या आमदारांनी सत्ता मागत असताना आपण जनतेसाठी काय केले हे दाखवून द्यावे, असे आव्हान मावळते नगरसेवक डॉ. योगेश क्षीरसागर यांनी आमदार संदीप क्षीरसागर (Mla Sandeep Kshirsagar) यांना दिले.

बीड नगर पालिका निवडणुक तोंडावर आली आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठी नगर पालिका असलेली बीड राजकीय दृष्ट्याही महत्वाची नगर पालिका मानली जाते. (Marathwada) मागच्या ३० वर्षांपासून क्षीरसागरांचे नगर पालिकेवर वर्चस्व आहे. राज्यात सर्वाधिक काळ नगराध्यक्ष राहण्याचा विक्रम करणाऱ्या डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी मागच्या नगर पालिका निवडणुकीत शेवटची निवडणुक असे जाहीर केलेले आहे.

आता त्यांनी चिरंजीव डॉ. योगेश क्षीरसागर यांना रिंगणात उतरविले आहे. त्यामुळे ही निवडणुक काका - पुतण्या ऐवजी भावा- भावांत होणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर मागच्या काही दिवसांपासून संदीप क्षीरसागर यांनी शहरातील विविध विकास कामांच्या भूमिपुजनाचा सपाटा लावला आहे. त्याला डॉ. योगेश क्षीरसागर यांनी असे उत्तर दिले. डॉ. क्षीरसागर म्हणाले, अडीच वर्षांत आमदारांनी काय दिवे लावले हे अगोदर बीडच्या जनतेला सांगावे.

आम्ही नव्हे आमचा विकास बोलतो, विकासाच्या माध्यमातूनच आम्ही जनतेच्या जवळ राहिलेलो आहोत. म्हणूनच तर जनतेने ३० वर्षे सत्ता दिली. मात्र या सत्तेचा उपयोग सर्वसामान्यांच्या हितासाठी आम्ही केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बीड शहरासह स्थानिक भागातील विकासाचे प्रश्न सोडविले.

तुम्ही समर्थकांनाही न्याय देऊ शकला नाहीत म्हणून सहकारी सोडून आमच्याकडे येत असल्याचे डॉ. योगेश क्षीरसागर म्हणाले. ज्यांना स्वतःचे नगरसेवक, कार्यकर्ते सांभाळता येत नाहीत ते शहर सांभाळण्याच्या गप्पा मारू लागलेत, जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी पदाला खेळ समजू नका, आमच्यातला आणि तुमच्यातला फरक बीडच्या जनतेने ओळखला आहे, नारळ फोडून किंवा सर्व्हे करण्यासाठीचे उद्घाटन करून कामे होत नसतात, तीने महिन्याने काय केले हे सांगण्यापेक्षा अडीच वर्षे काय दिवे लावले हे जनतेला सांगा.

Dr.Yogesh-Mla Sandeep Kshirsagar, Beed
अमित शहांना वादात ओढणं नितेश राणेंना पडलं महागात!

गोरगरिबांना आशेला लावून मतदान घेतले तेच लोक आता तुम्हाला पुन्हा घरचा रस्ता दाखवतील. बीड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जयदत्त क्षीरसागर व डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी कायम प्रयत्न केल्याचेही डॉ. क्षीरसागर म्हणाले. नारळ फोडण्याचा अधिकार कुणाचा असतो ही साधी बाब जर विद्यमान आमदारांना माहीत नसेल तर विकास करण्याची गोष्ट करता कशाला? जर खरोखरच विकासप्रिय असता तर शहरातील गोरगरीब वस्त्यातील होणारा विकास अडवला नसता, आम्हीही राजकारण करतो पण विरोधकांच्या देखील वार्डात विकास करून दाखवतो, असेही क्षीरसागर यांनी निक्षून सागितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com