Maharashtra Assembly Election: धाकधूक वाढली; महायुती की महाविकास आघाडी राजकीय विश्लेषक म्हणतात...

Maharashtra Vidhan Sabha Election: या निवडणुकीत मनसे, एमआयएम, वंचित आघाडी व इतर छोटे-मोठे पक्ष मैदानात उतरले आहेत. त्यामुळे या निवडणुकीतील चुरस वाढली असतानाच राजकीय विश्लेषकाने या विधानसभा निवडणुकीत महायुती की महाविकास आघाडी कोण बाजी मारणार याचे समीकरणच उलघडून सांगितले आहे.
MVA- Mahayuti
MVA - MahayutiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी लवकरच मतदान होत आहे. राज्यातील प्रचार शिगेला पोहचला असून सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्यातच निवडणूक आता रंगतदार अवस्थेत पोहचली आहे.

या निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीने जोर लावला असली तरी या निवडणुकीत मनसे, एमआयएम, वंचित आघाडी व इतर छोटे-मोठे पक्ष मैदानात उतरले आहेत. त्यामुळे या निवडणुकीतील चुरस वाढली असतानाच राजकीय विश्लेषकाने या विधानसभा निवडणुकीत महायुती की महाविकास आघाडी कोण बाजी मारणार याचे समीकरणच उलघडून सांगितले आहे.

मतदानाला काही दिवसाचा अवधी असला तरी सध्या विधानसभेसाठी तुल्यबळ स्पर्धा पहावयास मिळत आहे. येत्या काळात काही जणांना बदल हवा असला तरी मतविभागणीचा फटका कोणाला बसणार ? याची उत्सुकता लागली आहे. राज्यात त्रिशंकू अवस्था राहील असे वाटत नाही. तर मनसेमुळे मराठी मताचे ध्रुवीकरण झाले तर तर ती जाणारी मते महायुतीची असणार की महाविकास आघाडीची यावरून कोणाचा फायदा होणार आहे हे समजून येईल. तर एमआयएम व वंचित बहुजन आघाडी, अपक्ष व बंडखोरांमुळे होणारी मतविभागणीचा फटका कोणाला बसणार ? यावर यश अपयश अवलंबून असणार आहे, असे राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी स्पष्ट केले.

MVA- Mahayuti
Uddhav Thackeray : दुसऱ्यांदा बॅग तपासणी, आता मोदींची बॅग महाराष्ट्रातून जाताना तपासा; ठाकरेंचे निवडणूक आयोगाला चॅलेंज

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील 48 पैकी 30 जागी महाविकास आघाडीने विजय मिळवला. त्यामध्ये काँग्रेसने 14 जागा तर शिवसेना ठाकरे गटाने 9 जागा तर काँग्रेसला एक जागी विजय मिळवता आला. तर महायुतीला 17 जागी विजय मिळवता आला. त्यामध्ये भाजपला 9, शिवसेना शिंदे गटाला 7 तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ एक जागी विजय मिळवता आला. तर एक जागी अपक्ष विजयी झाला होता. त्यासोबतच राज्यातील विधानसभेच्या 165 जागेवर महाविकास आघाडीला लीड मिळाला आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यातील चित्र बदलेल असाच कयास सर्वांचा होता. मात्र हे चित्र बदलण्याचा प्रयत्न महायुतीकडून करण्यात आला.

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील महायुती सरकारने त्यांच्या विरोधात करण्यात आलेला अपप्रचार रोखण्याचा प्रयत्न केला. तर लोकसभा निवडणुकीनंतर महायुती बॅकफूटला गेली असल्याचे जाणवत होते. मात्र, त्यानंतर महायुतीने पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केले आहे. विशेषतः महायुतीने विविध योजनांची घोषणा करीत मोठी आघाडी घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या धक्क्यातून महायुती थोडीशी सावरल्याचे दिसत आहे.

MVA- Mahayuti
Nitin Gadkari : टीव्ही फोडण्याची धमकी दिली म्हणून बापाने दिले मुलाला तिकीट; नितीन गडकरी यांची टोलेबाजी

विशेषता त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व शेतकरी, महिला, युवकांसाठी विविध योजना आणल्या. त्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीत झालेले नुकसान भरून काढण्याची रणनीती महायुतीमधील तीन पक्षाने मिळून आखली होती. त्यामध्ये लाडकी बहीण योजना त्यांच्यासाठी उपयुक्त ठरल्याचे दिसत आहे.

निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी विभागवार मोठे मेळावे घेत राज्यभर वातावरण निर्मिती करण्यात ते यशस्वी झाले आहेत. विशेषता या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी मोठ्या प्रमाणात लाडकी बहीण योजनेची जाहिरातबाजी केली आहे. त्याशिवाय लाडकी बहीण योजनेसह इतर योजनेचा प्रचार व प्रसार जोरात केला.

विशेषतः मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना महिलांमध्ये लोकप्रिय ठरत असल्याचा फायदा त्यांनी प्रचारासाठी करून घेतला आहे. विशेष त्यासाठीचे ब्रँडिंग मोठ्या प्रमाणात केले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना (Shivsena) शिंदे गटाने एकत्रित येत राज्यभर मेळावे घेत मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात यशस्वी झाल्याने त्याचा फायदा महायुतीला होताना दिसत आहे. विशेषता गेल्या काही दिवसातील टीव्ही, रेडिओ व वर्तमानपत्रातील जाहिरातीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ब्रॅण्डिंग केले आहे. त्यामुळे राज्यातील चित्र बदलले आहे.

MVA- Mahayuti
Uddhav Thackeray Video : मोठी बातमी! हेलिपॅडवर बॅगांची तपासणी, उद्धव ठाकरेंनी घेतली निवडणूक अधिकाऱ्यांची झाडाझडती

दुसरीकडे महाविकास आघाडीने सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेला प्रत्युत्तर देण्यासाठी महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून महिलांना महिना तीन हजार रुपये व बसचा प्रवास मोफत करण्याचे आश्वासन दिले आहे. तर शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना व मुला-मुलींना मोफत शिक्षण योजना देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता येत्या काळात कोणत्या योजनेला नागरिक प्रतिसाद देतात यावर यश अपयश अवलंबून असणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अद्याप दहा दिवसाचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे अद्याप या निवडणुकीचा कल स्पष्टपणे समजून येत नाही. विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरु झाला असला तरी दोन्ही बाजूनी सावध पावले टाकली जात आहेत. प्रचार काळात महायुतीकडून माजी मंत्री सदाभाऊ खोत व खासदार धनंजय महाडिक यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली तर महाविकास आघाडीकडून खासदार अरविंद सावंत यांनीही महिलाविरोधी वक्तव्य करीत वाद ओढून घेतला आहे.

MVA- Mahayuti
Nitin Gadkari : टीव्ही फोडण्याची धमकी दिली म्हणून बापाने दिले मुलाला तिकीट; नितीन गडकरी यांची टोलेबाजी

या विधानसभा निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीसोबतच मनसे, एमआयएम व बहुजन आघाडी उतरली आहे. त्याशिवाय मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली असल्याने त्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.

राज्यात या निवडणुकीत मनसे मोठ्या प्रमाणात जागा लढवत आहे. त्याचा फटका कुणाला बसणार यावरून बरेचसे काही अवलंबून आहे. मनसेमुळे जर मराठी मताचे ध्रुवीकरण झाले तर निश्चितच त्याचा तोटा महायुती व महाविकास आघाडीला होणार आहे. मनसेमुळे मराठी मताचे ध्रुवीकरण झाले तर तर ती जाणारी मते महायुतीची असणार की महाविकास आघाडीची मते त्यांच्या पारड्यात जाणार यावरून कोणाचा फायदा होणार आहे हे समजून येईल.

MVA- Mahayuti
Sharad Pawar : 'वस्ताद' आले अन् होमग्राऊंडवरच भाजपच्या 'संकटमोचका'ला धडकी भरवून गेले!

दुसरीकडे दलित आणि मुस्लिम मते महाविकास आघाडीच्या पारड्यात लोकसभा निवडणुकीप्रमाणे गेले तर ते महाविकास आघाडीसाठी फायद्याची ठरणार आहेत. मात्र, या मतांमध्ये जर पुन्हा एमआयएम व वंचीत बहुजन आघाडीमुळे विभागणी झाली तर महाविकास आघाडीला याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

येत्या काळात महाविकास आघाडीला मनोज जरांगे यांनी उमेदवार उभे न केल्याचा फायदा होणार आहे. तर विदर्भात शेतीमालाचे दर पडले आहेत. त्यामुळे सरकारविरोधात नाराजी आहे. दुसरीकडे दहा वर्षांपासून हे सरकार असल्याने मतदारांना बदल हवा आहे, तर दलित व मुस्लिम व्होटबँक आघाडीसोबत लोकसभेप्रमाणे राहणार असल्याने त्याचा फायदा होणार आहे.

MVA- Mahayuti
Sharad Pawar : रावसाहेब दानवेंची कार्यकर्त्यांला 'फाईट'; शरद पवार म्हणाले, त्यांच्या पक्षात सहकाऱ्यांना कसं वागवलं जातं याचं...

मनसे, एमआयएम, वंचित आघाडीमुळे होणाऱ्या मतविभागणीचा फायदा महायुतीला होणार आहे. दुसरीकडे अपक्ष व बंडखोर उमेदवारामुळे होत असलेल्या मतविभागणीचा फायदा महायुतीला होईल तर राज्य सरकारने केलेल्या विविध योजना मदतीला येण्याची शक्यता आहे.

त्यामुळे मतदानाला काही दिवसाचा अवधी असला तरी सध्या विधानसभेसाठी तुल्यबळ स्पर्धा होताना दिसत आहे. येत्या काळात काही जणांना बदल हवा असला तरी मतविभागणीचा फटका कोणाला बसणार ? याची उत्सुकता लागली आहे. राज्यात त्रिशंकू अवस्था राहील असे वाटत नाही, असे राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी स्पष्ट केले.

MVA- Mahayuti
Maharashtra Assembly Election: मुंबईतील मतविभागणीचा फटका मविआला का महायुतीला? कुठले मुद्दे ठरणार निर्णायक

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com