Adarsh Society Scam : आदर्श पतसंस्था घोटाळा प्रकरणी १९ जणांच्या मालमत्ता जप्तीचे आदेश..

Scams News : दिलीप वळसे पाटील यांनी मोर्चाला समोर जात एका महिन्यात ठेवीदारांचे पैसे परत देण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन दिले होते.
Adarsh Society Scam News
Adarsh Society Scam NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada News : छत्रपती संभाजीनगर येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत दोनशे कोटीहून अधिकचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होते. या पतसंस्थेत ४० हजाराहून अधिक ठेवीदारांच्या ठेवी अडकल्या आहेत. (Adarsh Society News) संचालक मंडळ बरखास्त केल्यानंतर सहकार विभागाने ठेवीदारांच्या ठेवी परत मिळवून देण्यासाठी कारवाई सुरू केली आहे.

Adarsh Society Scam News
Santosh Bangar On MP Jadhav: खासदार जाधव स्वार्थी, त्यांनी लोकांचे रक्त पिण्याचेच काम केले...

या अतंर्गत पतसंस्थेच्या काही संचालक आणि बड्या थकीत कर्जदारांच्या एकूण १९ मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आला होता. अखेर (Collector) जिल्हाधिकारी आस्तीककुमार पांडेय यांनी या प्रस्तावाला मंजुरी देत मालमत्ता जप्तीच्या कारवाईला परवानगी दिली आहे. (Scams) त्यामुळे थकबाकीदारांच्या १९ मालमत्तांच्या विक्रीतून २१ कोटी रुपयांची वसुली होण्याची शक्यता आहे.

आदर्श पतसंस्थेत लाखोंच्या ठेवी बुडाल्यामुळे हवालदिल झालेल्या काही ठेवीदरांनी आत्महत्या केल्या, तर काहींचा धसका घेतल्यामुळे मृत्यू झाला. नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीवरही आदर्शच्या ठेवीदारांनी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला होता. या मोर्चावर पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्यानंतर आक्रमक झालेल्या मोर्चेकरांनी मंत्र्यांनी स्वतः येऊन आमचे म्हणणे ऐकून घ्यावे, अशी भूमिका घेतली होती.

अखेर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मोर्चाला समोर जात एका महिन्यात ठेवीदारांचे पैसे परत देण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच फरार संचालकांना आठ दिवसांत अटक करण्याचे आदेशही पोलिसांना दिले होते. त्यानंतर पतसंस्थेतील घोटाळ्याला जबाबदार संचालक आणि बड्या थकीत कर्जदारांच्या मालमत्ता जप्त करण्याच्या कारवाईला वेग आला होता.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनीही या संदर्भात बैठक घेऊन मालमत्ता जप्तीची कारवाई लवकर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. अखेर जिल्हाधिकाऱ्यांकडून १९ मालमत्ता जप्तीच्या कारवाईला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com