Hingoli News: पिकांना योग्य भाव मिळत नाही आणि सरकारकडूनही शेतकऱ्यांना कुठल्याच योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे हिंगोली जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र अद्यापही सुरू आहे.
गेल्या आठ महिन्यांत तब्बल 685 शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केली आहे. अशातच आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील दहा शेतकऱ्यांनी दहा नग याप्रमाणे किडनी 75 हजार रुपये, लिव्हर 90 हजार रुपये आणि डोळे 25 हजार रुपये असे स्वतःचे अवयव विकत घ्या, अशी मागणी तहसीलदारामार्फत थेट मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली आहे.
हिंगोली जिल्ह्यात मागील सहा महिन्यांत अनेक शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आपलं जीवन संपवलं आहे. आता तर बँकेचे कर्ज फेडण्यासाठी जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाने स्वतःच्या शरीरातील अवयव विक्रीला काढली आहेत. सेनगाव तालुक्यातील दहा शेतकऱ्यांचे स्वतःचे अवयव विक्री करण्याचे दरपत्रक सध्या व्हायरल होत आहे. शेतकऱ्याचा हा निर्णय सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आमचे अवयव खरेदी करून बँकेच्या कर्जाची परतफेड करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून केली आहे. या निवेदनावर गजानन कावरखे, दीपक कावरखे, विजय कावरखे, दशरथ मुळे, संजय मुळे, अशोक कावरखे, रामेश्वर कावरखे, गजानन जाधव, धीरज मापारी, नामदेव पतंगे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
ठाकरे सरकार कोसळल्यानंतर नव्याने सत्तेत आलेलं शिंदे-फडणीस-पवार सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या सोबत असल्याचा दावा करतंय, सरकारच्या काळात , कर्जाची रक्कम फेडण्यासाठी स्वतःच्या शरीरातील अवयव विकण्याची दुर्दैवी वेळ बळीराजावर आली आहे.जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाच्या या निर्णयामुळे आता तरी सरकार शेतकऱ्यांसाठी काही ठोस भूमिका घेणार की राज्यातल्या बळीराजाला वाऱ्यावर सोडणार असा प्रश्न पडला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.