Osmanabad : माजी खासदार गायकवाडही शिंदे सेनेत दाखल ; मुंबईत घेतली भेट..

तीन दशकाहुन अधिक काळ शिवसेनेत सक्रिय राहुन वलय निर्माण केलेले प्रा. रविंद्र गायकवाड आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी जाऊन त्यांना भेटले. (Osmanabad Shivsena)
Ex. Mp. Pro.Ravindra Gaikwad Join Shinde Team News, Osmanabad
Ex. Mp. Pro.Ravindra Gaikwad Join Shinde Team News, OsmanabadSarkarnama

उस्मानाबाद : एकीकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पक्ष आणखी फुटू नये यासाठी जुन्या शिवसेनेच्या नेत्यांना बढती आणि जबाबदाऱ्या देत आहेत. तर दुसरीकडे पक्षात राहून अनेक वर्ष खासदारकी भोगलेले नेते शिंदेसेनेची वाट धरत आहेत. (Osmanabad) उस्मानाबादचे माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली असून ते देखील शिंदेसेनेत दाखल झाले आहेत. (Shivsena)

उस्मानाबाद जिल्ह्यातून यापुर्वी भूम-परांड्याचे आमदार प्रा. तानाजी सावंत, उमरग्याचे ज्ञानराज चौघुले यांनी शिंदेंना पाठिंबा दर्शवलेला आहे. (Marathwada) तानाजी सांवत यांना तर नव्या सरकारमध्ये कॅबिनेटमंत्रीपद देखील मिळाले आहे. प्रा.रविंद्र गायकवाड व आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यामध्ये गुरू शिष्याचे नाते आहे. चौगुले यांनी जेव्हा शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शिंदेच्या बंडाला साथ दिली होती.

तेव्हा माजी खासदार गायकवाड यांनी मात्र आपण शिवसेनेतच राहणार असल्याची भूमिका घेतली होती. त्यांच्या या भूमिकेचे शिवसेनेकडून स्वागत देखील झाले होते. दरम्यान, शिंदेंचे बंड यशस्वी झाले, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तारूढ होऊन शिंदेंच्या गळ्यात मुख्यमंत्र्यांची माळ पडली. त्यानंतर प्रा. गायकवाड यांचे देखील मतपरिवर्तंन झाले की काय? अशी चर्चा त्यांनी मुख्यमंत्र्यांची मुंबईत भेट घेतल्यानंतर सुरू झाली आहे.

Ex. Mp. Pro.Ravindra Gaikwad Join Shinde Team News, Osmanabad
Hingoli : बांगरांना टक्कर देण्यासाठी शिवसेनेचे आता दोन जिल्हाप्रमुख..

तीन दशकाहुन अधिक काळ शिवसेनेत सक्रिय राहुन वलय निर्माण केलेले प्रा. रविंद्र गायकवाड आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी जाऊन त्यांना भेटले. दोन वेळा आमदार, एक वेळा खासदार, जिल्हाप्रमुख, किल्लारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची संधी शिवसेनेच्या माध्यमातून गायकवाड यांना मिळाली होती. मध्यंतरी काही कारणामुळे गायकवाड राजकारणापासून अंतर राखून होते, पण तेव्हाही पक्षाने गायकवाड यांची काळजी घेतली होती.

लोकसभा निवडणूकीत उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज होते, पण त्यांनी पक्ष सोडला नव्हता. परंतु आज भविष्याचा वेध घेत गायकवाड यांनी अखेर ठाकरेंची साथ सोडत शिंदे सेनेत जाणे पंसत केले. मुख्यमंत्र्यांच्या भेटीत `आमच्याबरोबर रहा, आपण जेष्ठ आहात. आपला योग्य तो सन्मान केला जाईल`, असा शब्द शिंदे यांनी गायकवाड यांना दिल्याची माहिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com